पावसाळ्यात बळावतात पोटाचे विकार, दुर्लक्ष करणे पडेल महागात... जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 16:47 IST2021-06-27T16:46:36+5:302021-06-27T16:47:20+5:30
पावसाळ्याचा हंगाम कितीही छान वाटला तरी त्यामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या हंगामात, आपल्या शरीरातील पचनक्रिया मंदावते, तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील कमजोर होते.

पावसाळ्यात बळावतात पोटाचे विकार, दुर्लक्ष करणे पडेल महागात... जाणून घ्या उपाय
पावसाळ्याचा हंगाम कितीही छान वाटला तरी त्यामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या हंगामात, आपल्या शरीरातील पचनक्रिया मंदावते, तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील कमजोर होते. त्यामुळे गॅस, अपचन, पोटदुखी, डोकेदुखी यांसारख्या समस्यांबरोबरच, इतर आजारांना बळी पडण्याचा धोकाही वाढतो. आपल्या पचन तंत्राच्या दुरुस्तीसाठी, तसेच आपल्या रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी प्रभावी ठरेल, असे काही उपाय आपण जाणून घेऊया..
- आजकाल लोक अन्न उशिरा खातात व थेट झोपायला जातात. अशा परिस्थितीत अन्न पचायला वेळ मिळत नाही आणि पाचन तंत्राला त्रास होतो. पावसाळ्यात पाचन तंत्र अधिक संवेदनशील असल्याने सामान्य दिवसांपेक्षा, या दिवसांत अधिक त्रास होण्याची शक्यताही जास्त असते. म्हणून, दररोज वेळेवर खाण्याची सवय लावा. तसेच, प्रत्येक अन्न चावून खा.
- थंड गोष्टी पाचनशक्ती कमी करतात, म्हणून पावसाळ्यात थंड गोष्टी घेणे टाळा. जर तुम्हाला थंड पाणी प्यायचे असेल, तर मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणीच प्या.
- फायबरयुक्त आहार पचन तंत्राला बळकट करतो. म्हणून, तंतुमय फळं, संपूर्ण धान्य, भाज्या, शेंगदाण्यांसारख्या फायबर समृद्ध घटकांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा.
- तांबेच्या भांड्यात पाणी पिणे हे सर्वात आरोग्यदायी आहे.नपोटाच्या सर्व समस्यांसाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेशीर आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय लावून घ्या. परंतु, तांब्याचे भांडे लाकडावर किंवा टेबलावर ठेवा.
- जर पाचक प्रणाली निरोगी ठेवायची असेल, तर प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून एक दिवस उपवास केला पाहिजे. उपवासाच्या दिवशी फळं आणि रस इत्यादि सेवन करा. लांघनामुळे पाचक प्रणालीला विश्रांती मिळते आणि शरीराला स्वतःला रीसेट करण्यासाठी वेळ मिळतो.
- दररोज सकाळी आणि संध्याकाळी चाला. सकाळी योग आणि प्राणायाम केल्यास पाचन तंत्र मजबूत होते. पाचन तंत्रासाठी त्रिकोणासन, पश्चीमोत्तानासन आणि पवनमुक्तासन अत्यंत फायदेशीर आहेत. सकाळी चालत अताना, वेगवान चालण्याचा प्रयत्न करा आणि संध्याकाळी सामान्य वेगाने चाला.
- अन्न खाल्यानंतर किमान अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यावे, यामुळे अन्न पचण्यास मदत होते. यामुळे पाचन शक्ती मजबूत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आणि दोन्ही वेळा जेवल्यानंतर अर्धा तासाने कोमट पाणी प्या.