शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

तुळशीसारखी दिसणारी 'ही' वनस्पती डायबिटीसच्या रुग्णांसाठी ठरतेय वरदान, नाव आहे....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 1:08 PM

ही खास वनस्पती आपण आपल्या घरी देखील लावू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही औषधी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात नसल्याप्रमाणेच कॅलरीज असतात. चहा किंवा अनेक गोड पदार्थांमध्ये आपण साखरेऐवजी ही वनस्पती वापरू शकता.

स्टीविया एक औषधी वनस्पती आहे. जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे या वनस्पतीची चव साखरेप्रमाणचे गोड आहे. स्टीविया वनस्पतीला गोड तुळस असेही देखील म्हणले जाते. त्याची पाने अगदी तुळशीच्या पानांसारखी दिसतात. विशेष म्हणजे ही खास वनस्पती आपण आपल्या घरी देखील लावू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही औषधी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात नसल्याप्रमाणेच कॅलरीज असतात. चहा किंवा अनेक गोड पदार्थांमध्ये आपण साखरेऐवजी ही वनस्पती वापरू शकता.

बरेच लोक चहा आणि कॉफी गोड करण्यासाठी स्टीवियाच्या वाळलेल्या पानांचा वापर करतात. स्टीवियाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे लोह, प्रथिने, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, व्हिटॅमिन ए, सी सारख्या पोषक घटकांनी समृद्ध आहे. हे सर्व पोषक आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तसेच इतर अनेक आरोग्य फायदे देखील या वनस्पतीचे आहेत.

स्टीविया म्हणजे काय?स्टीविया जगभरातील अनेक देशांमध्ये नैसर्गिक गोडव्यासाठी वापरली जाते. हे स्टीविया वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते. सामान्यतः बोली भाषेत लोक त्याला गोड पाने म्हणतात. याचे सेवन करुन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित केली जाते. 2011 च्या एका संशोधनानुसार, स्टीवियामध्ये मधुमेह-विरोधी गुणधर्म आहेत. यासोबतच यात क्षती बीटा पेशीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी देखील गुणधर्म आहेत. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी स्टीविया खूप फायदेशीर आहे.

मधुमेहाच्या रुग्णासाठी फायदेशीरस्टीवियामध्ये कॅलरीज जास्त नसतात. एका अभ्यासानुसार, स्टीवियाच्या वापरामुळे इन्सुलिनच्या प्रमाणावर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी या वनस्पतीची पाने अनेक प्रकारच्या डिशमध्ये वापरू शकतात. स्टीविया साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

कर्करोगया औषधी वनस्पतीमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे कर्करोगविरोधी लढते. स्टीवियामध्ये केम्फेरोल नावाचा अँटीऑक्सिडेंट घटक असतो. हे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतो. स्वादुपिंडाचा कर्करोग रोखण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे.

वजन कमी करण्यास मदतस्टीविया ही वनस्पती गोड असूनही कॅलरीज खूप कमी असतात. वजन वाढवण्याची चिंता न करता आपण ते आपल्या आहारात समाविष्ट करू शकतात. विशेष म्हणजे स्टीवियाचा लहान मुलांच्या आहारात त्याचा समावेश करू शकता. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही साखरेऐवजी आहारामध्ये स्टीवियाचा समावेश करू शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

रक्तदाबाची समस्यास्टीवियामध्ये ग्लायकोसाइड्स असतात. जे शरीरातून अतिरिक्त सोडियम काढून टाकण्यास मदत करतात. हे रक्तदाब पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. हे हृदयविकाराचा धोका कमी करते. यामुळे आपण आपल्या आहारात स्टीवियाचा समावेश केला पाहिजे.

असे करा सेवनतज्ज्ञांच्या मते दररोज स्टीविया पावडर घेतल्यास मधुमेहामध्ये लवकरच आराम मिळतो. यासाठी अर्धा ग्रॅम स्टीविया पाण्यात किंवा दुधात मिसळा आणि दररोज त्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. साखरेपेक्षा 20 पट जास्त गोडपणा देखील देतो. हे इतर अनेक रोग निर्मूलन करण्यास सक्षम आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स