शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सावधान... अति झोपणं जिवावरही बेतू शकतं; जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:13 PM

दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीची पुरेशी झोप पूर्ण होणे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक बाब असते. रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात.

ठळक मुद्दे8 तासांहून अधिक वेळ झोपल्यास मृत्यूचा धोकागरजेपेक्षा अधिक झोप घेऊ नकाजास्त वेळ झोपणाऱ्यांना हृदयसंबंधित आजारांचा धोका

नवी दिल्ली - दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीची पुरेशी झोप पूर्ण होणे आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक बाब असते. रात्रीच्या वेळेस पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. उदाहरणार्थ तणाव, चिंताग्रस्त, डोकेदुखी, अपचन, थकवा इत्यादी शारीरिक तसंच मानसिक त्रास होऊ लागतात. पण लक्षात ठेवा पुरेशी झोप घेणे याचा अर्थ खूप वेळ झोपून राहणं, असा होत नाही. गरजेहून अधिक झोप घेतल्यास याचाही विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो. गरजेपेक्षा जास्त वेळ झोपणे कदाचित तुमच्या जिवावरही बेतू शकते, अशी माहिती एका संशोधनाद्वारे समोर आली आहे.  

रात्री सहा ते आठ तासांपेक्षा अधिक झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयरोगासंबंधी आजार (Cardiovascular Diseases) होण्याची शक्यता असते आणि मृत्यूचा धोकाही वाढतो.  जी लोक 8 तासांहून अधिक झोप घेतात, त्यांना हृदयसंबंधित रोग उदाहरणार्थ हृदयविकाराचा झटका येणे, हृदयाची प्रक्रिया बंद पडणं आणि यामुळे मृत्यू होण्याचा धोका 41 टक्के असतो, अशी माहिती मॅकमास्टर अँड पेकिंग युनियन मेडिकल कॉलेजतर्फे करण्यात आलेल्या संशोधनाद्वारे समोर आली आहे.  

काही जण आरोग्याच्या समस्यांच्या कारणांमुळे गरजेपेक्षा जास्त झोपतात, या लोकांमध्ये हृदयसंबंधित रोग होण्याचे धोके अधिक असतात, असा शोध संशोधकांनी लावला आहे. या संशोधनातील माहिती जर्नल ऑफ युरोपियन हार्टमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. संशोधनकर्त्यांनी दिवसा झोप घेणाऱ्या लोकांमध्येही आरोग्यसंबंधित संभाव्य धोक्यांचेही निरीक्षण केले. संशोधक चौंगशी वांग यांनी सांगितले की, जी लोक रात्री 6 तासांहून अधिक झोपतात आणि दिवसाही काही वेळासाठी झोप घेतात. या लोकांमध्ये हृदयसंबंधित आजार आणि मृत्यूचा धोका अधिक असल्याचं आढळून आले. तर दुसरीकडे, जी लोक 6 तासाहून कमी झोपतात तसंच दिवसाही त्यांना झोपण्यासाठी पुरेसे वेळ मिळत नाही, त्यांना या समस्यांचा सामना करावा लागत नाही.   

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स