पोटावर झोपल्यामुळे शरीराला उद्भवतोय 'या' समस्यांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 05:49 PM2020-01-22T17:49:17+5:302020-01-22T17:54:33+5:30

साधारणपणे लहान मुलांना पोटावर झोपण्याची सवय असते अनेकदा त्यांना आपली सवय सोडणं हे कठीण वाटत असतं.

Sleeping on the stomach causes major damage to the body | पोटावर झोपल्यामुळे शरीराला उद्भवतोय 'या' समस्यांचा धोका

पोटावर झोपल्यामुळे शरीराला उद्भवतोय 'या' समस्यांचा धोका

googlenewsNext

(image credit- memoryfoamtalk)

साधारणपणे लहान मुलांना पोटावर झोपण्याची सवय असते. अनेकदा त्यांना आपली सवय सोडणं हे कठीण वाटत असतं. लोकांना असं वाटत असतं की पोटावर झोपल्यामुळे  लवकर झोप येते. कारण त्यांना असं झोपण्याची सवय झालेली असते. म्हणून मुलांना लहानपणापासून पाठीवर झोपण्याची  सवय लावणं गरजेचं आहे. कारण मुलांचं  वय जसजसं वाढत जातं तसतसं त्यांना आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. अनेकदा पोटावर झोपल्यामुळे अन्न पचनास त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास फक्त लहान मुलांना नाही तर मोठ्या वयोगटात सुद्धा  दिसून येतो. 

Image result for sleeping on stomach
(image credit- bellysleep.com)

पाठ दुखण्याचा त्रास

Image result for sleeping on stomach(image credit- greatist)

पोटावर झोपल्यामुळे तुम्हाला पाठ दुखण्याची समस्या उद्भवू शकते. कारण पोटावर झोपल्यामुळे पाठीवर अतिरिक्त दबाव येण्याची शक्यता असते.  त्यामुले मनगटाची हाडं  दुखण्याचा धोका उद्भवू शकतो.  पोटावर झोपल्यामुळे  स्पाईनल कॉर्ड नॅचरल शेपमध्ये नसते. त्यामुळे पाठ दुखण्याचा त्रास होण्याची शक्यता  असते. 

मान दुखण्याचा त्रास

Image result for sleeping on stomach(image credit- sattva)

पोटावर झोपल्यामुळे मान दुखण्याचा त्रास उद्भवत असतो. कारण अशा स्थितीत झोपल्यामुळे मानेवर जास्त ताण येत असतो. या प्रकारे झोपल्यामुळे मानेचं आणि डोक्याचं पोश्चर व्यवस्थित राहत नाही. जास्तवेळ यात स्थितीत झोपून राहिल्यामुळे सर्वाईकल  पेन बरोबरच खांदे दुखण्याची समस्या उद्भवू शकते. ( हे पण वाचा-तुमच्या हिरड्यांचा रंग काळा आहे का? जाणून घ्या याची कारणे.... )

गरोदरपणात समस्या

Image result for sleeping on stomach(image credit-livingwellmn.com)

 ज्या महिलांना पोटावर झोपण्याची  सवय असते. त्यांना सुरूवातीला  गर्भावस्थेत असताना अनेक समस्या उद्भवण्याचा धोका  असतो. महिलांना पोटाच्या खालच्या भागात दुखणे हे त्यापैकीच एक आहे.  जर गरोदर असताना महिला पोटावर झोपत असतील तर शरिरातील रक्ताभिसरण सुरळित न होता डिस्टर्ब होण्याचा धोका असतो. तसंच पोटावर झोपल्यामुळे बाळाला ऑक्सिजन पुरेश्या प्रमाणात मिळत नाही. म्हणून बाळ आणि आई या दोघांच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो.( हे पण वाचा-रोजच्या वापरात असलेल्या 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, वेळीच व्हा सावध)

Web Title: Sleeping on the stomach causes major damage to the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.