चेहऱ्याला क्रीम लावणं ठरू शकतं जीवघेणं, किडनीला धोका असल्याचा रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 10:51 AM2019-12-14T10:51:35+5:302019-12-14T10:55:59+5:30

सतत बदलत्या वातावरणात आपला चेहरा तसेच त्वचेला सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.

Skin cream containing mercury may damage your kidney | चेहऱ्याला क्रीम लावणं ठरू शकतं जीवघेणं, किडनीला धोका असल्याचा रिसर्चमधून खुलासा

चेहऱ्याला क्रीम लावणं ठरू शकतं जीवघेणं, किडनीला धोका असल्याचा रिसर्चमधून खुलासा

googlenewsNext

(Image credit-adultpediatricuro.com)

सतत बदलत्या वातावरणात आपला चेहरा तसेच त्वचेला सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो.  त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीचे प्रोड्क्स आपण वापरतो. पण त्वचेला गोरं बनवण्यासाठी जर तुम्ही कोणत्या क्रिमचा वापर करत असाल तर ही बाब घातक ठरू शकते. कारण या क्रिम्स तयार करत असताना शरीरासाठी हानीकारक असणाऱ्या घटकांचा वापर केला जातो.

(Image credit- allure)

अनेक फेअरनेस क्रीम्समध्ये मर्क्यूरीचा वापर केला जातो. अशा क्रीम्सचा वापर केल्याने शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुमच्या त्वचेला सॉफ्ट आणि ग्लोईंग बनवायचा दावा  करणाऱ्या क्रीम्स तुमच्या शरीराला हानीकारक ठरतात. एव्हढेच नाही तर या क्रीम्सच्या वापराने गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कारण यात शरीरास घातक ठरणाऱ्या मर्क्यूरी पाऱ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच क्रीम्स बाजारात हजारोंच्या संख्येने विकल्या जातात. 

(image credit- Healthline) 

दिल्लीच्या गफ्फार मार्केट येथून काही फेअरनेस क्रीम्सचे सॅम्पल्स  तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात ४८.१० ते १ लाख १० हजार पीपीएम इतके मर्क्यूरीचे प्रमाण आढळून आले. फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगभरात या क्रीम्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो असा दावा मर्क्यूरी वर्किंग ग्रुपमार्फत करण्यात आला आहे. हा ग्रुप स्वतंत्रपणे मर्क्यूरीमुळे होणारे प्रदूषण यावर काम करत आहे. जीरो मर्क्यूरी वर्कींग ग्रुप हा तब्बल १२ देशात कार्यरत आहे. या ग्रुपमार्फत करण्यात आलेल्या दाव्यानुसार सगळ्यात जास्त फेअरनेस क्रीम्स या आशियात तयार केल्या जातात. 

आपल्या मेकअपच्या उत्पादनांचा सगळ्यात जास्त परिणाम किडनीवर होतो. मस्कारा तसंच डोळ्याच्या मेकअपच्या वस्तुंमध्ये जास्त मर्क्यूरी आढळून येतो. या उत्पादनांच्या वापरामुळे किडनी खराब  होऊ शकते.  याशिवाय मर्क्यूरीचा संपर्क शरीराशी झाल्याने नर्वस सिस्टीम तसंच फुफ्पुसांवर परिणाम घडून येतो. त्याचप्रमाणे पाचनशक्ती मंदावणे, डिप्रेशन, त्वचेवर पुळ्या येणे, चट्टे येणे यांसारख्या त्वचेच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो.

Web Title: Skin cream containing mercury may damage your kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.