शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

आता घामामुळे समजणार तुमच्या शरीरातील समस्या; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 13:18 IST

अनेकदा आपण आरोग्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकदा ब्लड टेस्टचा आधार घेतो. परंतु आता ब्लड टेस्टची गरज नाही. कारण संशोधकांनी एक स्किन सेन्सर तयार केलं आहे.

अनेकदा आपण आरोग्याबाबत जाणून घेण्यासाठी अनेकदा ब्लड टेस्टचा आधार घेतो. परंतु आता ब्लड टेस्टची गरज नाही. कारण संशोधकांनी एक स्किन सेन्सर तयार केलं आहे. जे आपल्या घामाची टेस्ट करून तुमच्या तब्बेतीबाबत सांगणार आहे. एवढचं नाहीतर हे सेन्सर तुम्ही अगदी सहज वेअर करू शकता. तसेच हे सेन्सर तुम्हाला शरीरातील पाण्याची कमतरता आणि थकवा यांबाबतही माहिती देणार आहे. 

कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीचे प्रोफेसर अली जावे यांनी सांगितले की, 'या प्रोजेक्टचा हेतू फक्त स्किन सेन्सर तयार करणं हा नसून आपल्या शरीरातून उत्सर्जित होणारा घाम आपल्या आरोग्याबाबत काय सांगतो हेदेखील जाणून घेण्याचा उद्देश होता. त्यासाठी आम्हाला एका अशा सेन्सरची गरज होती, जो आरोग्याबाबत योग्य माहिती देण्यासाठी उपयोगी पडेल. ज्याचा सतत वापर करणं शक्य असेल. ज्याचा वापर आपल्या शरीराच्या विविध अवयवांवर करणं शक्य असेल. 

सोडिअम आणि पोटॅशिअमच्या प्रमाणाबाबत माहिती...

संशोधकांनी हा सेन्सर एक्सरसाइज करणाऱ्या व्यक्तींच्या शरीराच्या विविध अवयवांवर लावण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणारा घाम तसेच त्यामध्ये असलेलं सोडिअम आणि पोटॅशिअमचं प्रमाण जाणून घेणं शक्य झालं. तसेच एक्सरसाइज करताना शरीरामध्ये पाण्याची कमतरता वेगाने होते हेदेखील समजण्यास मदत झाली. तसेच शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या घामाच्या प्रमाणावरून हे समजू शकत की,  हार्ड वर्कआउटवर जाण्याआधी एखाद्या अॅथलिटला कोणत्या गोष्टींबाबत सावधानी बाळगणं गरजेचं असतं. घामाचा सॅम्पलही घेता येतो. 

संशोधकांनी तयार केलेल्या स्किन सेन्सरमध्ये माइक्रोस्कोपिक ट्यूब आणि मायक्रोफ्लूड लावण्यात आले आहेत. ज्याच्या मदतीने शरीरातून घामाचा सॅम्पल घेणं अत्यंत आवश्यक असतं. सेन्सर ट्रॅक करतो की, घामाचं किती वेगाने शरीरातून उत्सर्जन होत आहे. अशाप्रकारे सेन्सर यूजरला माहिती देतो की, 'शरीरातून किती घाम उत्सर्जित होत आहे.'

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही त्या केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स