मुलींसारखं बसणं त्रासदायक आणि मुलांसारखं बसणं फायदेशीर का असतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 09:54 AM2019-12-07T09:54:55+5:302019-12-07T10:08:16+5:30

आपण अनेकदा ऐकतो की, मुलींना अनेकदा व्यवस्थित बसण्यासाठी किंवा 'सिट लाइक अ लेडी' असा सल्ला दिला जातो.

Sitting like a man is beneficial for women joints | मुलींसारखं बसणं त्रासदायक आणि मुलांसारखं बसणं फायदेशीर का असतं?

मुलींसारखं बसणं त्रासदायक आणि मुलांसारखं बसणं फायदेशीर का असतं?

Next

आपण अनेकदा ऐकतो की, मुलींना अनेकदा व्यवस्थित बसण्यासाठी किंवा 'सिट लाइक अ लेडी' असा सल्ला दिला जातो. मुलींसारखं बसणे म्हणजे पाय क्रॉस करून बसणे किंवा पाय पसरून नाही तर जवळ-जवळ करून बसणे. पण हा सल्ला फारच चुकीचा आहे. असा दावा आमचा नाही तर हे मेडिकली स्पष्ट झालं आहे.

मुलांसारखं पाय पसरून किंवा दोन पायांमध्ये गॅप ठेवून बसणं जॉइंट्ससाठी चांगलं असतं. असा दावा टेक्सासच्या सर्टिफाइड ऑर्थोपेडिक सर्जन बार्बरा बर्जिन यांनी केलाय. डॉक्टरांचा यावर इतका विश्वास आहे की, त्यांनी महिलांच्या फायद्यासाठी S.L.A.M. (Sit Like A Man) मोहिम सुरू केली आहे. 

वीकेंड्सला नव्हता 'हा' त्रास 

(Image Credit : mydr.com.au)

डॉक्टर बार्बरा यांना ३२ वयापासूनच गुडघ्यांमध्ये वेदना होण्याची समस्या होती. पण वीकेंडला त्यांचा हा त्रास कमी होत होता. त्यामुळे त्यांना प्रश्न यावरून प्रश्न पडला की, असं कसं होतं. बार्बरा यांना वाटलं की, त्यांना छोटी कार चालवावी लागत नसावी म्हणून असं होत असावं. कारण छोटी कार चालवताना गुडघे किंवा पाय जवळ असतात, ज्यामुळे वेदना होत होत्या. 

कारण

महिलांचा कंबरेचा भाग हा पुरूषांच्या तुलनेत रूंद असतो त्यामुळे जांघेचं हाड आतल्या बाजूने हिप जॉइंटपासून वाकतं. या रोटेशनमुळे हिप्स आणि गुडघ्यांमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे मुलींसारखं पाय क्रॉस करून बसणं त्रासदायक ठरू शकतं. त्यांनी सांगितले की, वयानुसार ही समस्या आणखी बिघडत जाते आणि पुरूषांसारखं बसल्याने वेदना कमी होऊन लगेच आराम मिळतो.

पाय पसरून बसा

(Image Credit : nny360.com)

महिला कशाप्रकारे बसतात याचा थेट प्रभाव त्यांच्या हाडांशी संबंधित समस्यांवर पडतो. या समस्या पुरूषांसारखं आरामात बसून सुधारल्या जाऊ शकतात. यासाठी तुम्ही पाय पसरून आरामात बसलं पाहिजे.

कशी असावी पोजिशन

(Image Credit : wallpaperbetter.com)

पुरूषांसारखं बसण्यासाठी दोन गुडघे एकमेकांपासून दूर ठेवा. पाय क्रॉस करू नका. बसलण्यासाठी सर्वात आरामदायी पोजिशन म्हणजे डावा पाय घड्याळातील ११ वाजत्या पोजिशनकडे ठेवा आणि उजवा पाय १ वाजताच्या पोजिशनमध्ये ठेवा. 


Web Title: Sitting like a man is beneficial for women joints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.