नाकातील केस कापण्याची असेल सवय तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतात हे गंभीर नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 13:22 IST2024-01-04T13:22:16+5:302024-01-04T13:22:53+5:30
Nose Hair Plucking :नाकातील केसांमुळे वळवळ नक्कीच होत असेल आणि ते चांगले दिसत नसले तरी ते आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

नाकातील केस कापण्याची असेल सवय तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतात हे गंभीर नुकसान
Nose Hair Plucking : अनेक लोकांना सवय असते की, नाकातील केस चिमट्याने काढतात, कात्री किंवा इतर वस्तुने काढतात किंवा कापतात. जर तुम्हीही असं करत असाल तर वेळीच व्हा सावध. कारण असं केल्याने आरोग्य बिघडू शकतं. नाकातील केसांमुळे वळवळ नक्कीच होत असेल आणि ते चांगले दिसत नसले तरी ते आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. चला जाणून घेऊ नाकातील केस तोडल्याने किंवा कापल्याने काय नुकसान होतात.
इन्फेक्शनचा धोका
नाकातील केस आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फार महत्वाचे असतात. हे श्वास घेताना सगळ्या गोष्टी फिल्टर करून आत पाठवतात. नाकातील केस कापल्याने किंवा काढल्याने इन्फेक्शनचा धोका होतो. जेव्हाही तुम्ही नाकातील केसा काढता तेव्हा फॉलिकल्सजवळचे किटाणू आणि कण फिल्टर न होताच आत जातात.
ब्रेनला होऊ शकते इजा
आपलं तोंड आणि नाकामध्ये चेहऱ्यावर एक त्रिकोणीय आकाराचा भाग असतो. याने मेंदुला फंक्शन करण्यास मदत मिळते. ज्या नसा नाकातून रक्त बाहेर नेतात, त्या मेंदुला रक्त पुरवठा करणाऱ्या नसांसोबत मिळून काम करतात. जेव्हा नाकातील केस खेचून काढले जातात तेव्हा तेव्हा किटाणू मेंदुपर्यंत पोहोचू शकतात आणि फंक्शन प्रभावित करू शकतात.
बॅक्टेरिया पसरण्याची भीती
नाकातील केस कापल्याने किंवा वॅक्स केल्याने रोमछिद्र बॅक्टेरिया आणि इतर किटाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. यामुळे नाकातील केस किटाणूची निर्मिती रोखू शकत नाही. यामुळे मेंदुपर्यंत बॅक्टेरिया पोहोचू शकतात.
नाकातील केस कसे कापावे?
जर तुमच्या नाकातील केस फार वाढले असतील आणि तुम्हाला ते काढायचे असतील ते खेचून तोडण्याऐवजी ट्रिम करा. याने जास्त नुकसानही होणार नाही आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहतं.