शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

शरीरातील युरिक अ‍ॅसिड वाढलं तर होतो 'हा' गंभीर आजार, सुरु करा 'या' भाज्या कच्च्या खायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 15:31 IST

अतिरिक्त विषारी पदार्थ (Toxins) फिल्टर करू शकत नाही आणि ते रक्तात मिसळून शरीराच्या सांध्यातल्या गॅपमध्ये जमा होऊ लागतं. यामुळेच सांध्यांमध्ये जडपणा, वेदना आणि सूज येण्याची समस्या उद्भवते.

हल्लीच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला आपल्या आहाराकडे काळजीपूर्वक लक्ष देणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेकवेळा आरोग्याशी संबंधित समस्या डोकं वर काढतात. याचप्रमाणे शरीरात युरिक अ‍ॅसिडचं (Uric Acid) प्रमाण वाढलं, तर तेदेखील आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आहार नीट नसेल तर शरीरातलं युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढतं. जेव्हा आपल्या शरीरात प्युरीन नावाचे केमिकल कंपाउंड मोठ्या प्रमाणात तयार होते, तेव्हा युरिक अ‍ॅसिड तयार होऊ लागतं. त्या वेळी किडनी (Kidney) शरीरात तयार होणारे अतिरिक्त विषारी पदार्थ (Toxins) फिल्टर करू शकत नाही आणि ते रक्तात मिसळून शरीराच्या सांध्यातल्या गॅपमध्ये जमा होऊ लागतं. यामुळेच सांध्यांमध्ये जडपणा, वेदना आणि सूज येण्याची समस्या उद्भवते.

युरिक अ‍ॅसिड तयार होण्यापासून वेळीच रोखलं नाही तर संधिवात (arthritis) होण्याची शक्यता बळावते. नंतर उठणं, बसणं आणि चालणंही कठीण होऊन जातं. आज आम्ही तुम्हाला अशा तीन भाज्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या सांधेदुखीवर नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. या भाज्या कच्च्या खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिड लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडतं. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'डीएनए हिंदी'ने दिलं आहे.

कांदा, टोमॅटो आणि लिंबू या तीन भाज्या रोज कच्च्या सॅलडप्रमाणे खाण्याची सवय लावली, तर शरीरात जमा झालेलं युरिक अ‍ॅसिडही बाहेर पडेल. तसंच ते बनण्याची प्रक्रियाही कमी होईल. दररोज किमान 100 ग्रॅम कांदे, दोन लिंबू आणि तीन ते चार टोमॅटोचं सेवन सांधेदुखीवर औषधांप्रमाणे काम करतं.

टोमॅटोयुरिक अ‍ॅसिडची वाढती पातळी कमी करण्यासाठी भाज्यांप्रमाणेच फळंही अत्यंत उपयुक्त आहेत. टोमॅटोमध्ये (Tomato) फायबर्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतं. ते शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन करायला, तसंच युरिक अ‍ॅसिडची पातळी कमी करण्यास मदत करतं.

कांदायुरिक अ‍ॅसिड कंट्रोल करण्यासाठी, शरीरातलं मेटाबॉलिझम योग्य असणं महत्त्वाचं आहे. कांद्यामध्ये (Onion) फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, सी आणि ई, तसंच सल्फर मुबलक प्रमाणात असतं. अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त असलेला कांदा युरिक अ‍ॅसिडवर औषधाप्रमाणे काम करतो. कांद्यामध्ये असलेले घटक शरीरात नॉर्मल प्रोटीनचं प्रमाण वाढवतात. त्यामुळे शरीरात प्युरिन कमी प्रमाणात तयार होतं.

लिंबूदररोज 500 मिलीग्राम व्हिटॅमिन सीचे सेवन केल्यास शरीरात युरिक अ‍ॅसिड तयार होण्याची प्रक्रिया कमी होईल. लिंबामध्ये (Lemon) असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म सूज आणि आखडलेपणा कमी करतात. लिंबू शरीर डिटॉक्स करण्यासाठीदेखील खूप उपयुक्त आहे.

कांदा, टोमॅटो आणि लिंबू कच्चं खायला आवडत नसेल, तर तिन्ही ब्लेंडरमध्ये टाकून त्याची पेस्ट तयार करा. नंतर ते स्मूदीप्रमाणे खा किंवा त्याचा रस प्या. रिकाम्या पोटी त्याचं सेवन केल्यास युरिक अ‍ॅसिड झपाट्याने कमी होतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स