काळी मिरी जरी असली गुणकारी तरी जास्त सेवनाने दुष्परिणाम पडतील भारी, वाचा तोटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 17:15 IST2022-08-09T17:13:40+5:302022-08-09T17:15:14+5:30
काळी मिरी आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते. जी धोकादायकदेखील असू शकते. चला तर मग जाणून घेऊया अति प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते.

काळी मिरी जरी असली गुणकारी तरी जास्त सेवनाने दुष्परिणाम पडतील भारी, वाचा तोटे
प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळणारी काळी मिरी अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरली जाते. याशिवाय काळी मिरी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. याचा उपयोग चहा आणि काढा बनवण्यासाठी केला जातो. काळी मिरी आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध, काळी मिरी लिव्हर, आतडे आणि किडनीचीदेखील काळजी घेते. त्यात कर्करोगविरोधी गुणधर्मदेखील आहेत. इतके फायदे असूनही काळी मिरी आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते. जी धोकादायकदेखील असू शकते. चला तर मग जाणून घेऊया अति प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते.
गॅसची समस्या वाढू शकते
स्टाइलक्रेजच्या मते, अधिक काळी मिरी खाल्ल्याने गॅस्ट्रिक म्यूकोसल समस्या वाढू शकतात. याचे सेवन केल्यावर घसा आणि पोटात जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. याशिवाय बद्धकोष्ठता, जुलाबाची समस्यादेखील होऊ शकते. काळी मिरी गरम असते. त्यामुळे तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर काळी मिरी खाणे टाळावे.
गरोदरपणात धोका
गरोदरपणात गरम पदार्थ खाणे टाळावे. गरोदरपणात काळी मिरी फार कमी प्रमाणात खावी. बाळाला दूध पाजल्यास काळी मिरी अजिबात खाऊ नये. यामुळे बाळाच्या पोटात जळजळ होऊ शकते. तसेच उष्ण हवामान असले तरी काळी मिरी खाणे टाळा.
फर्टिलिटी कमी होऊ शकते
काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर म्हणजेच फर्टिलिटीवर लक्षणीय परिणाम होतो. जर पुरूषांनी काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ली केली तर त्यांच्या संयुग गुणधर्मांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
त्वचेच्या समस्या वाढू शकतात
जर त्वचेमध्ये ओलावा असेल तर ती सुंदर आणि चमकदार दिसेल. ओलावा मिळविण्यासाठी गरम पदार्थ खाणे टाळावे. ते खाल्ल्याने त्वचेला खाज येण्याची समस्या, त्वचारोग किंवा पिंपल्सदेखील होऊ शकतात.
शिंक येऊ शकते
काळी मिरी जास्त प्रमाणात खाल्ल्याने शिंका येऊ शकतात. ही फार गंभीर समस्या नाही. पण त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण काळ्या मिरीमध्ये असलेले पाइपरिन हे इरिटेन्ट म्हणून काम करते आणि त्यामुळे नेजाल म्युकस मेम्ब्रेनमध्ये जळजळ वाढते आणि शिंका येणे सुरू होतात.