(Image Credit : whatmobile.net)
मोबाइल आता लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. लोकांची कामे जेवढी या मोबाइलमुळे सोपी झाली, तेवढ्याच काही आरोग्याबाबत समस्याही लोकांमध्ये वाढल्या आहेत. व्हिडीओ बघणे, सोशल मीडिया चेक करणे, गेम खेळणे, गाणी ऐकणे आणि अलार्म लावणे यासाठी फोनचा वापर अधिक केला जातो. त्यामुळेच झोपण्यापूर्वी आणि जागल्यानंतर जास्तीत जास्त लोक आपला स्मार्टफोन वापरतात. रात्रीच्या अंधारात फोन वारण्याच्या नुकसानाबाबत तुम्हाला माहीत असेलच, पण सकाळी उठल्या उठल्या मोबाइल चेक करणेही फार नुकसानकारक ठरतं. ते कसं हे जाणून घेऊ...
दिवसाची खराब सुरूवात
यूकेमध्ये २ हजार लोकांवर करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, सकाळी झोपेतून उठल्यावर मोबाइल केल्याने दिवसाची सुरूवातच स्ट्रेसने होते. याने मेंदूच्या वर्किंग प्रोसेस वर प्रभाव पडतो आणि कार्यक्षमतेवरही याचा परिणाम होतो.
काय सांगतात एक्सपर्ट?
एक्सपर्ट्सनुसार, जेव्हा व्यक्ती झोपेतून जागी झाल्यानंतर सर्वातआधी मोबाइलवर मेल किंवा नोटिफिकेशन चेक करतात, तेव्हा त्यांचा मेंदू त्याच संबंधी विचारांनी भरला जातो. यामुळे लोक इतर कोणत्याही गोष्टींवर किंवा कामांवर चांगल्याप्रकारे विचार करू शकत नाहीत.
स्ट्रेस आणि एंग्झायटी
झोपेतून उठल्यावर एकाच गोष्टीबाबत विचार करत राहिल्याने स्ट्रेस आणि एंग्झायटीचं प्रमाण वाढतं. सकाळच्या वेळी तसाही बीपी वाढलेला असतो, अशात तणावामुळे तो आणखी वाढू शकता जे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
गेल्या दिवसाचा प्रभाव
दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर जेव्हा व्यक्ती मेल किंवा नोटिफिकेशन चेक करतात तेव्हा व्यक्ती कालच्या दिवसाशी संबंधित गोष्टी वाचत असतो. एक्सपर्ट सांगतात की, यात असं होतं की, व्यक्तीचा प्रेजेंट पास्ट हायजॅक करतो. आणि नव्या दिवसाला नव्या प्रकारे जगण्याऐवजी गेल्या दिवसानुसारच व्यक्ती जगत असतो.
एकाग्रता कमी
एका सर्व्हेतून समोर आले आहे की, झोपेतून उठल्यावर सर्वातआधी मोबाइल चेक करणे आणि होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार केल्याने एकाग्रताही कमी होते. याचा प्रभाव ड्रायव्हिंगपासून ते ऑफिसमध्ये काम करण्यापर्यंत बघायला मिळतो.
काय करावे?
एक्सपर्टनुसार, सकाळी उठल्यावर लगेच मोबाइल चेक करण्याऐवजी गाणी ऐका किंवा मेडिटेशन करा. याने मेंदूला शांततापूर्ण सुरूवात मिळेल, ज्यामुळे तुमचा पुढचा दिवसही चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कामावर अधिक लक्ष देऊ शकाल.