उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ करण्याचे फायदे, वाचाल तर कधीच टाळणार नाही 'हे' काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 11:10 IST2024-03-09T10:42:21+5:302024-03-09T11:10:34+5:30

या दिवसात तुम्ही जर रात्री आंघोळ करत नसाल तर तुम्हाला त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Shower at night is the best time to bath in summer gives a lot of health benefits | उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ करण्याचे फायदे, वाचाल तर कधीच टाळणार नाही 'हे' काम!

उन्हाळ्यात रोज रात्री आंघोळ करण्याचे फायदे, वाचाल तर कधीच टाळणार नाही 'हे' काम!

उन्हाळ्यात जसजसा उन्हाचा पारा वाढतो आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. या दिवसात शरीराचं तापमानही वाढतं. दिवसभर येणारा घाम आणि घामाची दुर्गंधी हैराण करून सोडते. सकाळी आंघोळ करून घराबाहेर निघाल्यावरही काही वेळात अंग घामाने भिजून जातं. त्यामुळे शरीरावर धुळ-माती चिकटते.

काही लोक रात्री घरी जाऊन पुन्हा आंघोळ करून रिलॅक्स होतात. या दिवसात तुम्ही जर रात्री आंघोळ करत नसाल तर तुम्हाला त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सोबतच याने तुम्हाला झोपली चांगली येऊ शकत नाही. रात्री आंघोळ करण्याचे काही फायदेही आहेत ते जाणून घेऊया. 

हृदय राहतं निरोगी

रात्रीच्यावेळी शरीरात ब्लड सर्कुलेशन धीम्या गतीने होतं, त्यामुळे तुम्ही जर रात्रीच्यावेळी थंड पाण्यान आंघोळ कराल तर शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. अर्थातच याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. हृदय नेहमी निरोगी ठेवण्यासाठी रोज रात्री आंघोळ करण्याची सवय लावून घ्या.

फ्रेश वाटेल

उन्हाळ्याच्या दिवसात धुळ, माती आणि घामामुळे तुम्ही हैराण झालेले असतात. घामामुळे चिकटपणा  येतो आणि शरीर खायवायला लागतं. तसेच केसांमध्ये घामामुळे समस्या होते. अशात जर तुम्ही रोज रात्री घरी जाऊन आंघोळ केली तर शरीरावर साचलेली धुळ-माती निघून जाते आणि घामामुळे आलेला चिकटपणाही दूर होतो. त्यामुळे आंघोळ केल्यावर तुम्हाला फ्रेश आणि ताजंतवाणं वाटू लागतं. त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये साचलेली धुळ निघून जाते आणि त्वचेवर ग्लो दिसतो. 

झोप चांगली येते

उन्हाळ्यात उष्णतेमुळे इतर दिवसांपेक्षा अधिक थकवा आणि तणाव जाणवतो. त्यामुळे आरोग्य धोक्यात येतं. शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया बदलून जातात. त्यात झोपेचीही समस्या मुख्य आहे. एकतर गरमीमुळे आणि दुसरं म्हणजे शरीरातील उष्णतेमुळे लवकर झोप येत नाही. पण रात्री आंघोळ कराल तर तुम्हाला बेडवर पडल्या पडल्या चांगली झोप लागेल. 

इम्यूनिटी वाढते

या दिवसात अधिक उष्णतेमुळे अनेक गंभीर आजार होण्याचाही धोका असतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. पण रोज रात्री जर आंघोळ कराल तर तुमची इम्यूनिटी वाढू शकते. याने तुमची वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. 

Web Title: Shower at night is the best time to bath in summer gives a lot of health benefits