नखं खाण्याची सवय पडली महागात, कापावा लागला अंगठा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 11:33 IST2018-09-10T11:32:42+5:302018-09-10T11:33:06+5:30
नखं खाण्याची सवय असणे हे भीती आणि चिंतेचं सामान्य लक्षण मानलं जातं. पण सामान्य वाटणारी ही सवय तुम्हाला आयुष्यभरासाठी महागात पडू शकतं.

नखं खाण्याची सवय पडली महागात, कापावा लागला अंगठा!
(Image Credit : www.simplemost.com)
नखं खाण्याची सवय असणे हे भीती आणि चिंतेचं सामान्य लक्षण मानलं जातं. पण सामान्य वाटणारी ही सवय तुम्हाला आयुष्यभरासाठी महागात पडू शकतं. कारण या सवयीमुळे एका तरुणीचा अंगठा कापाला लागला. ब्रिस्बे, ऑस्ट्रेलियाची २० वर्षीय विद्यार्थीनीला तिची नखं खाण्याची सवय चांगलीच महागात पडली आहे.
शिक्षकांकडून आणि इतरांकडून मिळणाऱ्या ओरड्यामुळे आणि रागामुळे तणावात कोर्टनी व्हिथॉर्नने नखं खाण्यास सुरुवात केली होती. आता तिच्या या सवयीमुळेच तिच्या अंगठ्याला एक वेगळ्या प्रकारचा कॅन्सर झाला. या कॅन्सरपासून तिला वाचण्यासाठी डॉक्टरांना तिचा अंगठा कापावा लागला.
काय आहे प्रकरण?
कोर्टनी व्हिथॉर्नच्या असं लक्षात आलं की, काही वर्षात तिच्या अंगठ्याचा पुढील भाग काळा होत आहे. तपासणी केल्यावर तिला कळालं की, तिला एक्रल लेंटिगिनस सुबंगुअल मेलानोमा हा आजार झालाय. हा एक दुर्लभ प्रकारचा कॅन्सर आहे. जो त्वचेवर होतो. जनरली हा कॅन्सर पायांच्या तळव्यांमध्ये होतो. पण नखं खाण्याच्या सवयीमुळे तिला हा तिच्या हाताच्या अंगठ्याला झाला.
कापावा लागला अंगठा
नखं खाण्याच्या सामान्य वाटणाऱ्या सवयीमुळे २० वर्षीय कोर्टनी व्हिथॉर्नचा अंगठा कापावा लागला. जेणेकरुन संक्रमण तिच्या शरीरात पसरु नये. व्हिथॉर्नच्या आतापर्यंत चार सर्जरी झाल्या आहेत. शेवटच्या सर्जरीमध्ये तिचा अंगठा कापला गेला. हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार, हा कॅन्सर पुन्हा येतो की नाही हे बघण्यासाठी कोर्टनीला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली रहावं लागणार आहे.