भारतीय वैज्ञानिकांनी सांधेदुखीच्या औषधांमधील सल्फापायरीडाइनचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी रुग्णांना औषधं देण्याची नवीन पद्धत शोधली आहे. पंजाबमधील लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी (एलपीयू) तील तज्ज्ञांच्यामते सल्फापायरीडाईन हे आर्थरायटिसचे तिसरे सगळ्यात जुने औषध असून आतापर्यंत वापरली जात आहे. दीर्घकाळ या गोळ्यांचे सेवन केल्यानं चक्कर येणं, उलट्या होणं, पोटदुखी यांसारख्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो. आता डॉक्टरांनी रुग्णांच्या अवयवात थेट औषध पोहोचवण्याचे नवीन तंत्र विकसित केले आहे. 

 अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार एलपीयू मधील स्कूल ऑफ फार्मास्युटिकल साइंसेजचे प्राध्यापक भूपिंदर कपूर यांनी सांगितले की, ''आम्ही ही पद्धत  विकसित आहे. यामुळे शरीरातील त्रास असलेल्या भागापर्यंत औषध पोहोचवता येऊ शकतं. याशिवाय या पद्धतीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. ही एक सुरक्षित पद्धत आहे.'' ‘मॅटेरियल्स साइंस एंड इंजीनियरिंग सी’ या पत्रकात याबाबत शोध प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांनी सल्फापायरीडाइनचे एक नवीन प्रोड्रग विकसित करण्यासाठी तसंच औषधांमध्ये सहभागी करून घेण्याची माहिती दिली आहे. 

गठिया (सांकेतिक तस्वीर)

सगळ्यात आधी प्रोड्रग व्यक्तीच्या प्रभावित अवयवांमध्ये थेट इंजेक्ट केलं जाणार आहे. या प्रकारात औषधाच्या रुपात सेवन केल जात नाही. संशोधकांनी सांगितले की, यामुळे औषध संपूर्ण शरीरात न पसरता प्रभावित भागापर्यंत जाऊन आपलं काम सुरू करते.  संशोधकांनी  हे औषध देण्यासाठी प्री क्लिनिकल ट्रायल पूर्ण केले होते. या अभ्यासाचे विश्लेषण लुधियाना आणि तामिळनाडूतील ऊटीमधील जेएसएस कॉलेज ऑफ फार्मेसीच्या विद्यार्थ्यांसह मिळून केले होते.

तुम्हाला पायांची बोटे, गुडघे आणि टाचांमध्ये वेदना होत असतील तर समजा की, तुमच्या रक्तात यूरिक अॅसिडचं प्रमाण वाढलं आहे. हे हात आणि पायांच्या जॉईंटमध्ये क्रिस्टलच्या रुपात गोठतं आणि  त्यामुळे संधिवात होतो. 

किती प्रकारचा असतो संधीवात?

आमवात हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो पण सर्वात कॉमन आहे ऑस्टियो-आर्थरायटिस आणि रुमॅटायड आर्थरायटिस. त्यासोबतच इन्फेक्शन आणि मेटाबॉलिज्म आर्थरायटिसच्या केसेसही अधिक पाहण्यात आल्या आहेत. 

ऑस्टियो-आर्थरायटिस

हा वाढत्या वयासोबत सामान्यपणे ५० वयानंतर जास्त त्रास देतो. पण आता बदलत्या लाईफस्टाईलमुळे तरुणांमध्येही ही समस्या बघायला मिळत आहे. यात सामान्यपणे गुडघ्यांवर प्रभाव पडतो. त्यासोबतच बोटं आणि कंबरेतही समस्या होते, पण भारतात जास्त गुडघ्याची समस्या बघायला मिळते. 

रुमॅटायड आर्थरायटिस

हा एक ऑटोइम्यूनिटी असलेला आजार आहे. यात शरीर आपल्याच विरोधात काम करु लागतं. घरात आधी कुणाला हा आजार असेल तर परिवारातील इतरांना होण्याची शक्यता अधिक असते. यात हाताचे कोपरे, बोटं, खांदे, पायांचे जॉईंट्स यात वेदना होतात. नेहमी वेदना शरीराच्या दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही पाय, मनगटांमध्ये होते. यात हिवाळ्यात ही समस्या अधिक वाढते. 

गठिया (सांकेतिक तस्वीर)

लक्षणे

जॉईंट्समध्ये सूज, असहनीय वेदना, जॉईंट्समधून आवाज येणे, बोटांमध्ये वेदना होणे.

या आजाराची कारणे

ऑस्टियो आर्थरायटिस हा आजार वाढत्या वयामुळे जॉईंट्समध्ये होणाऱ्या कमजोरीमुळे होतो. वयानुसार तुमचं वजन फार जास्त असेल तर तुमच्या गुडघ्यांवर परिणाम होतो. तसेच शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याने ऑस्टियो आर्थरायटिसचं कारण ठरतं. त्यासोबतच एखाद्या जागेवर पुन्हा पुन्हा जखम झाल्यास, टीबीचं इन्फेक्शन झाल्यास किंवा हार्मोन बदल झाल्यास हा आजार होण्याची शक्यता असते. 

कसा कराव बचाव?

नियमीत एक्सरसाईज करा, नियमीतपणे कार्डियो, स्ट्रेथनिंग आणि स्ट्रेचिंग एक्सरसाईज करा. आठवड्यातून कमीत कमी ५ दिवस ४५ ते ५० मिनिटे एक्सरसाईज करा. कार्डियोसाठी जॉगिंग, ब्रिस्क वॉक, स्विमिंग आणि सायकलिंग करु शकता. ब्रिस्क वॉक प्रत्येक वयाच्या व्यक्तींसाठी सोपा आणि फायदेशीर आहे. काही एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की, ट्रेडमिलऐवजी पार्कमध्ये जॉगिंग करणे चांगलं आहे. 

लाईफस्टाईल अॅक्टिव ठेवा

फिजिकली तुम्ही जितके जास्त अॅक्टिव्ह असाल तितका आर्थरायटिस होण्याचा धोका कमी असतो. छोटी छोटी कामे आळस न करता स्वत: करा. जास्त वेळ एकाच पोजिशनमध्ये बसू नका. कोणत्याही भागावर जास्त दबाव टाकू नका. ऑफिसमध्ये कामातून दर ३० मिनिटांनंतर ५ मिनिटांचा ब्रेक घ्यावा. 

बॅलन्स डाएटची गरजेची

प्रोटीन आणि कॅल्शिअम असलेले पदार्थ भरपूर खावेत. त्यात पनीर, दूध, दही, ब्रोकली, पालक, राजमा, शेंगदाणे, बदाम यांचा समावेश आहे. हिरव्या भाज्या आणि फळेही खावीत. दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. मास्क लावताना आणि काढल्यानंतर तुम्हीही याच चुका करता? तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय

स्मोकिंग आणि ड्रिकिंग सोडा

धुम्रपान हृदयासाठी, फुफ्फुसांसाठी तसेच हाडांसाठी नुकसानकारक आहे. स्मोकिंग सोडल्याने आर्थरायटिसच्या रुग्णांना वेदना कमी होतात आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होते. जास्त मद्यसेवन केल्याने हाडांचे नुकसान होते.  खुशखबर! ऑक्सफर्ड एक्स्ट्राजेनका लसीला मोठं यश, तरूणांसह वृद्धांवरही ठरली प्रभावी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Scientists find new way to reduce the side effects of arthritis medicine sulfapyridine uses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.