मास्क लावताना आणि काढल्यानंतर तुम्हीही याच चुका करता? तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय

By manali.bagul | Published: October 26, 2020 11:43 AM2020-10-26T11:43:49+5:302020-10-26T12:18:46+5:30

CoronaVirus News & Latest Upadtes : बोलताना, चालताना, सार्वजनिक ठिकाणी मास्क काढल्यास मोठी किंमत मोजावी लागू शकते; कारण याद्वारे नकळतपणे कोरोना संसर्ग होऊ शकतो. तज्ज्ञांनी मास्कच्या वापराबाबत काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. 

Coronavirus vaccine covid vaccine india covaxin update coronavirus by experts | मास्क लावताना आणि काढल्यानंतर तुम्हीही याच चुका करता? तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय

मास्क लावताना आणि काढल्यानंतर तुम्हीही याच चुका करता? तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय

Next

जगभरातील कोरोना संक्रमणाचे रुग्ण वाढत आहेत.  भारतातही कोरोना संक्रमणाच्या केसेस वाढत आहेत. आतापर्यंत ७८ लाख ६४ हजारांपेक्षा अधिक लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस आणि औषध कधी उपलब्ध होणार, याच्या प्रतिक्षेत संपूर्ण जगभरातील लोक आहेत. दरम्यान मास्कचा वापर आणि टेस्टिंगचे प्रमाण वाढवले आहे. काही लोक मास्क वापरताना निष्काळजीपणा करताना दिसून येत आहेत.   बोलताना, चालताना, सार्वजनिक ठिकाणी मास्क काढल्यास मोठी किंमत मोजावी लागू शकते; कारण याद्वारे नकळतपणे कोरोना संसर्ग होऊ शकतो. तज्ज्ञांनी मास्कच्या वापराबाबत काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. 

भारतात कोवॅक्सिन कधीपर्यंत उपलब्ध होणार

वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. रमन  गंगाखेडकर यांनी अमर उजालाशी बोलताना सांगितले की, ''देशात तीन लसींवर सध्या काम सुरू आहे. पहिली झायडस कँडिला लस, दुसरी सीरम इंस्टिट्यूटची कोविशिल्ड आणि तिसरी भारत बायोटेकची कोवॅक्सिन. या तीनपैकी कोणती लस यशस्वी ठरते याकडे लक्ष देणं महत्वाचे ठरेल. भारतात लसीची उत्पादन क्षमता अधिक असल्याने कोणत्याही देशात लस तयार झाल्यास उत्पादनासाठी भारतातच यावे लागणार आहे. देशांतील लोकसंख्येच्या तुलनेत इतर देशांतील लोकांना लस मिळण्यास वेळ लागू शकतो.'' 

डॉ. रमन आर, गंगाखेडकर यांनी सांगितले की, ''नवीन कोरोना रुग्णांमध्ये घट होणं ही चांगली गोष्ट आहे.  त्यामुळे रुग्णालयात बेड खाली असल्याने रुग्णांना सहज बेड उपलब्ध होत आहेत. टेस्टिंग आणि लोकांच्या मेहनतीमुळे हे शक्य झालं आहे. मात्र येत्या काही महिन्यांमध्ये अजून सावधगिरी बाळगावी लागेल.  सण उत्सवांना सुरूवात होत आहे. त्यामुळे लोक मोठ्या संख्येने सणवाराची तयार करण्यासाठी घराबाहेर पडतात. या स्थितीमुळे संक्रमणाचा धोका उद्भवू शकतो.''

सतह पर रहता है वायरस

पुढे ते म्हणाले की, ''जोपर्यंत कोरोनाची लस किंवा औषध उपलब्ध होत नाही तोपर्यंत गंभीर आजार, डायबिटीस, कॅन्सर, ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. घरातील लोक वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जात असतील तर घरी आल्यानंतरही मास्कचा वापर करायला हवा. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत स्वतः सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करून नेहमी निरोगी राहा.

कोरोना व्हायरसचा प्रसार संक्रमित व्यक्तीच्या ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून होतो.  जास्तीत जास्त लोकांमध्ये कोरोनाची  कोणतीही लक्षणं दिसून  येत नाहीत. अशा स्थितीत आयसोलेट करणं कठीण असतं. कारण एसिम्प्टोमेटिक रुग्णांमध्ये संक्रमण ओळखणं सोपे नसते. जर चाचण्यांचे प्रमाण अधिक वाढवण्यात आले असते तर समाजाातील अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे कोरोनाने संक्रमित असले असते.'' संक्रमणानंतर ७ महिन्यांपर्यंत रुग्णांमध्ये असतात कोरोनाच्या एंटीबॉडी, तज्ज्ञांचा दावा 

अशी घ्या काळजी

मास्कच्या वापराबाबत गाईडलाईन्स देताना डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, मास्कबाबत अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. सध्या  लोक मास्कचा वापर करताना निष्काळजीपणा करताना दिसून येत आहेत. अनेकजण बोलताना, हसताना मास्क वर किंवा खाली  करतात. अशा स्थितीत बाहेरील व्हायरस सहज शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणून शक्यतो मास्कला स्पर्श करणं टाळा. मास्क लावताना आणि काढताना हात साबणाने स्वच्छ धुतलेले असावेत. एखाद्या व्यक्तीशी बोलताना  मास्त काढून बोलू नका. दोन किंवा तीन मास्क नेहमी स्वतःसोबत ठेवा. वापरानंतर मास्क साबणाने स्वच्छ धुवून एका दिवसाच्या अंतराने पुन्हा वापरा. पॉझिटिव्ह बातमी! कोरोनामुळे नष्ट होतोय 'हा' जीवघेणा आजार; रुग्णांमध्ये मोठी घट, तज्ज्ञांचा दावा

Web Title: Coronavirus vaccine covid vaccine india covaxin update coronavirus by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.