कॉमेडिअन समय रैना आले होते Anxiety Attack, हा नेमका काय त्रास, लक्षणं काय आणि कसा कराल बचाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:15 IST2026-04-09T13:14:39+5:302026-04-09T13:15:27+5:30
Samay Raina Anxiety Attack : समय रैनाला एंझायटी अॅटॅक येत होते. पण हा एंझायटी अॅटॅक काय असतो, त्याची लक्षणं काय असतात आणि त्यातून कसं बाहेर पडावं? या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

कॉमेडिअन समय रैना आले होते Anxiety Attack, हा नेमका काय त्रास, लक्षणं काय आणि कसा कराल बचाव
Samay Raina Anxiety Attack : समय रैना हे नाव काही आता नवीन राहिलेलं नाही. तरूणाईमध्ये त्याची मोठी क्रेझ आहे. त्याचे स्टँड-अप कॉमेडीचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. इंडियाज गॉट लेटेंट कंट्रोव्हर्सीनंतर समय पुन्हा एकदा चाहत्यांसमोर 'स्टिल अलाईव्ह' शोच्या माध्यमातून आला आणि सगळीकडे पुन्हा एकदा त्याचीच चर्चा रंगली. तब्बल १४ महिने तो सगळ्या गोष्टींपासून दूर गेला होता. समय रैनाने खुलासा केला की, वादानंतर त्याचं मोठं आर्थिक नुकसान तर झालंच, सोबतच त्याचं मानसिक नुकसानही झालं. त्याला एंझायटी अॅटॅक येणे सुरू झाले होते. पण अनेकांना हा एंझायटी अॅटॅक काय असतो हेच माहीत नाही. अशात हा एंझायटी अॅटॅक काय असतो, त्याची लक्षणं काय असतात आणि त्यातून कसं बाहेर पडावं? या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
काय असतो एंझायटी अॅटॅक?
आजचं जगणं असं झालंय ना की, एंझायटी अॅटॅक येणं किंवा सतत चिंतेत, तणावात राहणं फारच कॉमन झालंय. बरं याबाबत एक मोठा गैरसमज आहे की, एंझायटी अॅटॅकला लोक हार्ट अॅटॅक समजून टेंशन घेतात. पण मुळात ही मानसिक आरोग्यासंबंधी एक समस्या आहे. एंझायटी अॅटॅक हा जवळपास पॅनिक अॅटॅकशी मिळता - जुळता असतो. हा आला की, व्यक्तीला काहीही कारण नसताना अचानक भीती आणि धोक्याची भावना जाणवते. हा अॅटॅकचा पारा काही मिनिटांमध्ये वर वर चढतो आणि ५ ते ३० मिनिटांपर्यंत राहतो. पॅनिक अॅटॅक अचानकपणे येतो, तर सामान्य एंझायटी हळूहळू वाढते आणि कायम राहते.
एंझायटी अॅटॅकची लक्षणं
जर आपल्याला एंझायटी अॅटॅक आला तर अचानक खूप घाबरल्यासारखं वाटतं, भीती वाटते आणि काही शारीरिक लक्षणं दिसतात. एक्सपर्ट मानतात की, ही लक्षणं इतकी तीव्र होऊ शकतात की, आपल्याला हार्ट अॅटॅक येत असल्यासारखं वाटतं.
कशामुळे येतो?
एंझायटीच्या मुख्य कारणांमध्ये जास्त तणाव, कामाचा ताण, कौटुंबिक अडचणी, आर्थिक चिंता, एखादी मोठी घटना, ट्रॉमा, कॅफीन किंवा काही औषधे यांचा समावेश करता येईल. जेनेटिक्स, मेंदू रसायनांचं असंतुलन आणि लाइफस्टाईल याला वाढण्यात मोठी भूमिका निभावतात.
एंझायटीपासून बचावाचे उपाय
सायकॉलॉजिस्ट सांगतात की, एंझायटीची समस्या दूर करण्यासाठी सगळ्यात आधी लाइफस्टाईलमुळे बदल करावा. तसेच ब्रीदिंग म्हणजे श्वासासंबंधी व्यायामाचा सराव करा. या गोष्टींमुळे मानसिक दबाव आणि तणाव कमी होईल.
जर अॅटॅक पुन्हा पुन्हा येत असेल आणि रोजचं जगणं विस्कळीत होत असेल किंवा भीती वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासाठी कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी दिली जाते. गरज असल्यास औषधे सुद्धा दिली जातात. मुळात हे लक्षात घ्यायला पाहिजे की, एंझायटी अॅटॅक काही फार घातक नाही, पण जर याकडे दुर्लक्ष केलं तर त्रास वाढू शकतो. जागरूकता आणि योग्य उपाय केल्यास जगणं सोपं, सामान्य होऊ शकतं.