अंगदुखी आणि तापासाठी नेहमी अॅस्प्रिनचा वापर करता का? वेळीच व्हा सावध अन्यथा जाईल जीव....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 10:52 IST2019-12-12T10:45:35+5:302019-12-12T10:52:38+5:30
सामान्य अंगदुखी किंवा छोटा-मोठा ताप आला की, अनेकजण अॅस्प्रिनचा वापर करतात. या औषधामध्ये अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. याने रक्त पातळ होतं.

अंगदुखी आणि तापासाठी नेहमी अॅस्प्रिनचा वापर करता का? वेळीच व्हा सावध अन्यथा जाईल जीव....
सामान्य अंगदुखी किंवा छोटा-मोठा ताप आला की, अनेकजण अॅस्प्रिनचा वापर करतात. या औषधामध्ये अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. याने रक्त पातळ होतं. त्यामुळे अनेकजण हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी याचा वापर करतात. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून वैज्ञानिकांनी हे औषध वापरण्याबाबत इशारा दिला आहे. वैज्ञानिकांनुसार, हृदयरोग आणि स्ट्रोकची समस्या असताना अॅस्प्रिनचा सतत वापर केल्याने मेंदूमध्ये ब्लीडिंगची समस्या वाढू शकते.
अमेरिकेन हार्ट असोसिएशनने दिला इशारा
हा नवा रिसर्च समोर आल्यानंतर अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिऑलॉजीने अॅस्प्रिन नावाच्या औषधाच्या वापराच्या गाइडलाईन्स बदलल्या आहेत. अमेरिकन हार्ट असोसिएनच्या वेबसाइटवर लिहिले आहे की, 'डॉक्टरांच्या परवानगीशिवाय रोज अॅस्प्रिनचा डोज घेऊ नये'.
याआधीही केला होता रिसर्च
या रिसर्चनुसार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक रोखण्यासाठी रोज अॅस्प्रिनची गोळी खाल्ल्याने मेंदूमध्ये घातक स्वरूपात ब्लीडिंगची समस्या होऊ शकते. याआधीही ४२ ते ७४ वयोगटातील १ लाख ३० हजार लोकांवर करण्यात आलेल्या रिसर्चमधून ही बाब समोर आली होती की, जे लोक अॅस्प्रिनचा कमी डोजही रोज घेत असतील त्यांच्या मेंदूमध्ये ब्लीडिंगची समस्या ०.६३ टक्के वाढू शकते.
कुणाला असतो जास्त धोका
हृदयरोगाचे जे रूग्ण लठ्ठपणाचे शिकार आहेत. त्यांच्यात अॅस्प्रिनच्या वापराने ही समस्या वाढू शकते. रिसर्चनुसार, आशियातील लोक ज्यांच्या बीएमआय २५ किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांच्यात ब्लीडिंगची समस्या सर्वात जास्त असते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही अॅस्प्रिनचा वापर करू शकता. वयोवृद्ध लोकांमध्ये क्लॉटिंगची म्हणजे रक्त गोठण्याची समस्या अधिक असते. त्यामुळेच डॉक्टर त्यांना अॅस्प्रिन घेण्याचा सल्ला देतात.
काय घ्यावी काळजी?
या नव्या रिसर्चमधून अभ्यासकांनी लोकांना इशारा दिला आहे की, जे तरूण आणि ४५ वयापेक्षा अधिक लोक हृदयरोगाचे शिकार आहेत किंवा ज्यांना भविष्यात हृदयरोग होण्याचा धोका आहे त्यांनी अॅस्प्रिनचा वापर करताना काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करणे घातक ठरू शकतं. ब्रेन ब्लीडिंग ही एक गंभीर स्थिती असून ही जीवघेणीही ठरू शकते.