शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अलर्ट! तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग कधी कधी 'असा' लाल होतो?; गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:03 IST

Redness in Eyes : डोळ्यांचा पांढरा भाग लाल झाला आणि ही स्थिती अनेक दिवस कायम राहिली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे.

नवी दिल्ली - डोळे लाल होणं (Redness in Eyes) ही एक सामान्य समस्या आहे. ही समस्या साध्या अ‌ॅलर्जीमुळे देखील असू शकते किंवा ट्यूमर इत्यादीमुळे देखील असू शकते. किरकोळ बाब असल्यास स्वच्छतेची काळजी घेऊऩ ही समस्या टाळता येते. परंतु, जर तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग लाल झाला आणि ही स्थिती अनेक दिवस कायम राहिली तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही समस्या ब्लड शॉट्स आईजची असू शकते. यामध्ये डोळ्याच्या पांढऱ्या भागातील बारीक रक्तवाहिन्या पसरतात आणि त्या सुजतात. डोळ्यात कोणताही कचरा गेल्याने, कोणत्याही संसर्गामुळे एका किंवा दोन्ही डोळ्यांचा पांढरा भाग लाल होतो. याशिवाय जळजळ, टोचल्यासारखं वाटणं, खाज सुटणं, कोरडेपणा, वेदना इत्यादी समस्या असू शकतात. या समस्येबद्दल अधिक जाणून घेऊया...

'ही' असू शकतात कारण

अ‌ॅलर्जी, डोळ्यांचा थकवा, वायू प्रदूषण, धूळ, माती, रसायन किंवा सूर्यप्रकाश, कॉन्टॅक्ट लेन्सचा दीर्घकाळ संपर्क, डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग होणं उदा., कंजक्टिवाइटिस, ग्लूकोमा, डोळ्यांना दुखापत, कॉर्नियल अल्सर, डोळ्यांची शस्त्रक्रिया इ.

अशा परिस्थितीत तज्ज्ञांना भेटणं आवश्यक

- एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ टिकणारा लालसरपणा- प्रकाशासाठी अतिसंवेदनशीलता किंवा प्रकाश सहन न होणं- एका किंवा दोन्ही डोळ्यांमधून स्त्राव किंवा पाणी येणं- अंधुक दृष्टी- एका किंवा दोन्ही डोळ्यांत तीव्र वेदना

'असा' करा बचाव

- कॉन्टॅक्ट लेन्स जास्त वेळ घालू नका. - कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्यापूर्वी, त्या पूर्णपणे स्वच्छ करा. - रसायने किंवा हानिकारक पदार्थांपासून डोळ्यांचे संरक्षण करा. - डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांमध्ये कोणतेही ड्रॉप्स वापरू नका. - सूर्याच्या हानिकारक किरणांपासून डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी गॉगल वापरा. - जर एखाद्याला डोळे लाल होण्याची समस्या असेल तर, त्याच्या संपर्कात आल्यानंतर हात चांगले धुवावेत.

असे आहेत उपचार

डोळे लाल होण्याची समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टर डोळ्यांची तपासणी करून समस्या शोधून काढतात. अ‌ॅलर्जीमुळे समस्या असल्यास काही औषधं आणि आय ड्रॉप्स दिले जातात. बॅक्टेरियाच्या संसर्गाच्या बाबतीत तज्ज्ञ प्रतिजैविकांची मदत घेऊ शकतात. जर ट्यूमरची स्थिती निर्माण होत असेल, तर तज्ज्ञ त्यावर दीर्घ काळासाठी उपचार करू शकतात. त्यामुळे डोळे लाल होण्याची समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यeye care tipsडोळ्यांची निगा