'या' फळामुळे पसरतोय निपाह व्हायरस? लिचीसारखं दिसणारं हे फळ आणि वटवाघळं याआधीही चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 11:54 AM2021-09-07T11:54:37+5:302021-09-07T17:54:36+5:30

तुम्हाला माहित आहे का? की निपाह व्हायरसचा फैलाव होण्यासाठी एक फळं कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लिचीसारखं दिसणारं हे फळं सध्या चर्चेचा विषय ठरलंय.

rambutan fruit may be cause of nipah virus due to bat and rambutan tree contact | 'या' फळामुळे पसरतोय निपाह व्हायरस? लिचीसारखं दिसणारं हे फळ आणि वटवाघळं याआधीही चर्चेत

'या' फळामुळे पसरतोय निपाह व्हायरस? लिचीसारखं दिसणारं हे फळ आणि वटवाघळं याआधीही चर्चेत

Next

निपाह व्हायरसचा (Nipah Virus) धोका वाढू लागला आहे. केरळमध्ये याचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली. पण तुम्हाला माहित आहे का? की निपाह व्हायरसचा फैलाव होण्यासाठी एक फळं कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. लिचीसारखं दिसणारं हे फळं सध्या चर्चेचा विषय ठरलंय.  निपाह व्हायरसचा संसर्ग फैलावण्याशी या फळाचा संबंध असू शकतो, असं मानलं जात आहे. हे फळ ज्या ज्या मुलांनी खाल्लं होतं, त्या सगळ्या मुलांना निपाह व्हायरसचा संसर्ग झाला. त्यातल्या एका मुलाचा मृत्यूही झाला. 

दक्षिण आशियाई देशांमध्ये हे फळ मोठ्या प्रमाणावर आढळतं. त्याची चव लिचीसारखी (Litchi) असते. हे फळ आरोग्यासाठी लाभदायक असल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं. त्यामुळे काही त्रासही होतात; मात्र विषाणूचा प्रसार करणारं फळ अशी त्याची कधीच ओळख नव्हती. त्यामुळे निपाह व्हायरस या फळामुळे पसरला अशी जी चर्चा सध्या सुरू आहे, त्यात कदाचित असंही झालेलं असू शकतं, की वटवाघळांनी ते फळ खाल्लेलं असल्यामुळे त्या फळांच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार झाला असावा. गेल्या वेळीही जेव्हा केरळमध्ये निपाह व्हायरसचा फैलाव झाला होता, तेव्हा हे फळ आणि वटवाघळं (Bat) या दोन्हीही गोष्टी चर्चेत आल्या होत्या.

या फळाचं नाव आहे  रामबूतान फळ (Rambutan fruit). या फळाला लाल रंगाचं केसांसारखं कवच असतं. त्याच्या आत लिचीसारखा गोड गर असतो. या फळाच्या झाडावर वटवाघळांचं वास्तव्य असतं.

रामबूतान आरोग्यासाठी फायदेशीर
या फळात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यात प्रोटीन्स, फायबर्स, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, झिंक, कॉपर, रायबोफ्लेव्हिन, मँगनिज, नियासिन असे अनेक पौषक घटक असतात. फायटोकेमिकल्समुळे हे फळ अँटीडायबेटिक, अँटी अ‍ॅलर्जिक आणि अँटी मायक्रोबियल म्हणूनही ओळखलं जातं. हे फळ आहारात असेल, तर अनेक विकारांपासून बचाव होऊ शकतो.

हे फळ शरीरातली ऊर्जेची पातळी (Energy) वाढवतं. त्यात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन एदेखील काही प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास हातभार लागतो.

रामबूतान फळ आहारात असेल, तर पचनक्रियाही चांगली राहते. गॅस, अपचन आदी तक्रारी नाहीशा होतात. सौंदर्यवृद्धीसाठीही हे फळ काम करतं. हे फळ आहारात असेल, तर केस मजबूत होतात, त्यांना चमक येते आणि त्यांची वाढही चांगली होते.

रामबूतानचे शरीराला होणारे तोटे
रामबूतान फळात पोटॅशियम असल्यामुळे हे फळ जास्त प्रमाणात खाल्लं गेलं, तर उलट्या आणि डायरिया होऊ शकतो. या फळाच्या सालींच्या अर्काचं सेवन जास्त प्रमाणात केलं गेलं, तर शरीरातली Toxic Level वाढू शकते. व्हिटॅमिन सी असल्यामुळे हे फळ जास्त प्रमाणात खाल्लं तर पोट बिघडू शकतं. एखाद्या व्यक्तीला वेगळं काही खाल्ल्यानंतर अ‍ॅलर्जी होत असेल, तर या फळाचीही अ‍ॅलर्जी येऊ शकते.

लिची आणि रामबूतानमधला फरक
लिचीची फळं रामबूतानपेक्षा थोडी लहान आकाराची असतात. लिचीदेखील (Litchi) लाल रंगाचीच असते; मात्र लिचीच्या फळांची सालं जास्त खरखरीत असतात. लिचीचा गरही रामबूतानप्रमाणेच पांढऱ्या रंगाचा असतो; मात्र त्याचा स्वाद वेगळा असतो. दोन्हींच्या गरामध्ये मोठी बी असते. लिचीच्या साली जास्त जाड असत नाहीत. त्यामुळे साल सहजपणे वेगळं करता येऊ शकतं.

रामबूतान आणि वटवाघळांमधला संबंध
रामबुतानची झाडं जास्त असतात, तिथे वटवाघळं जास्त असतात, असं आढळतं. त्यांचं त्या झाडांवर वास्तव्य असतं. या फळांवरही ती बसतात. वटवाघळांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू आढळतात. त्यांचा या फळांशी संपर्क आल्यामुळे काही फळं संसर्गाची वाहक होण्याची शक्यता असते.

Web Title: rambutan fruit may be cause of nipah virus due to bat and rambutan tree contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.