शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

थंडीमध्ये वाढते सोरायसिसची समस्या; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 13:12 IST

वातावरणातील गारवा हळूहळू वाढत असून हिवाळ्याला सुरुवात होत आहे. या बदलत्या वातावरणात अनेक आजारांचा धोका वाढतो. ज्यामध्ये सोरायसिस या आजाराचाही समावेश होतो.

वातावरणातील गारवा हळूहळू वाढत असून हिवाळ्याला सुरुवात होत आहे. या बदलत्या वातावरणात अनेक आजारांचा धोका वाढतो. ज्यामध्ये सोरायसिस या आजाराचाही समावेश होतो. तसेच ज्या व्यक्ती आधीपासूनच या आजाराचा सामना करत आहेत. त्यांची समस्याही आणखी वाढू शकते. सोरायसिस एक असा त्वचारोग किंवा स्किन इन्फेक्शन आहे, जो डोक्याच्या त्वचेला केसांमध्ये, हात, पाय किंवा पाठीवर होतो. सोरायसिसला मुलापासून नष्ट करणं फार अवघड आहे. परंतु, हा आजार तुम्ही नियंत्रणात ठेवू शकता. अशातच आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांमुळे त्वचेची काळजी घेणं अत्यंत सोपं होइल. 

कशामुळे होतो सोरायसिस? 

जसं आपली नखं आणि केस वाढतात. त्याचप्रमाणे त्वचाही बदलत असतते. साधारणतः नवीन त्वचा येण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागतो. परंतु, सोपायसिस प्रभावित भागामध्ये त्वचा 3 ते 4 दिवसांमध्ये वेगाने बदलते. या आजारामध्ये ही त्वचा एवढी कमजोर होते की ती लगेच खराब होते. यामुळे त्वचेवर लाल चट्टे आणि रक्ताचे चट्टे दिसून येतात. 

 कोणत्या लोकांना होतो सोरायसिसची समस्या? 

सोरायसिसची समस्या 100 पैकी फक्त एक किंवा दोन टक्के लोकांना होते. ज्यामुळे साधारणतः अनुवांशिक, जिन्स, रोगप्रतिकार शक्ती आणि हार्मोन्समध्ये परिवर्तन जबाबदार असतं. परंतु, याव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी असतात. ज्या सोरायसिससाठी कारण ठरतात. 

  • कानात वेदना होणं, ब्रोंकायटिस, घशात इन्फेक्शन होणं
  • सोरायसिस थंड आणि ड्रायनेसमुळेही वाढतो. 
  • मद्य सेवन करणं, धुम्रपान आणि इतर व्यवसनांमुळेही सोरायसिस होण्याचा धोका वाढतो. 
  • तणाव हेदेखील सोरायसिस होण्यासाठी कारणीभूत ठरतात. तसेच तुम्ही आधीपासूनच सोरायसिसचे रूग्ण असताल तर हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. 
  • शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता किंवा तूप-तेल यांचं अजिबात सेवन करू नका कारण यामुळे त्वचा मॉयश्चराइज्ड होत नाही. 
  • प्रखर उन्हामध्ये सतत राहिल्यामुळे आणि त्वचेची काळजी न घेतल्यामुळेही सोरायसिसची समस्या उद्भवते. 

 

सोरायसिसची लक्षणं : 

  • सतत त्वचा निघणं.
  • त्वचेवर लाल चट्टे येणं.
  • कोपर, गुडघे किंवा कंबरेवरील त्वचा ड्राय होणं.
  • थंडीमध्ये त्वचा सतत कोरडी पडणं.
  • त्वचेवर सूज आणि खाज येणं, जळजळ होणं.

 

सोरायसिसमध्ये अशी घ्या काळजी : 

काय खावं? 

सर्वात आधी जाणून घेऊया की, सोरायसिसमध्ये काय खावं आणि काय खाऊ नये. सोरायसिसपासून सुटका करून घेण्यासाठी डाएट अत्यंत फायदेशीर ठरतं. डाएटमध्ये फळं, कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकली, आलं, ओवा, डाळी, कारल्याचा ज्यूस, बिया, ड्रायफ्रुट्स, मासे, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. 

या पदार्थांपासून दूर राहा

अल्कोहोल, सिगारेट, डेअरी प्रोडक्ट्स, जंक फूड, ट्रान्स फॅट फूड, ग्लूटनयुक्त पदार्थ खाणं टाळा. याव्यतिरिक्त सायट्रस पदार्थ जसं संत्री आणि लिंबू खाणंही टाळा. 

कोमट पाण्याने आंघोळ करा 

कोमट पाण्यामध्ये सैंधव मीठ, मिनरल ऑइल, दूध आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून आंघोळ करा. यामुळे जळजळ आणि खाज येण्यासारख्या समस्या दूर होतील. 

मॉयश्चरायझर लावा

आंघोळ केल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी मॉयश्चरायझर नक्की लावा. यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

भरपूर पाणी प्या 

दिवसभरात कमीत कमी 8 ते 9 ग्लास पाणी नक्की प्या. यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्वचा हायड्रेट राहते. 

हळदीची पेस्ट 

हळद पाण्यामध्ये एकत्र करून 5 ते 10 मिनिटं गरम करा. त्यानंतर आठवड्यात 2 ते 3 वेळा झोपण्यापूर्वी याची पेस्ट करून प्रभावित झालेल्या ठिकाणी लावा. यामध्ये असलेले अॅन्टी-इफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेच्या पेशी डॅमेज करण्यापासून बचाव करतात. 

ऑलिव्ह ऑइलने मालिश 

एक कप ऑलिव्ह ऑइलमध्ये तेलाचे काही थेंब आणि ऑर्गॅनिक ऑइल एकत्र करा. त्यानंतर सोरायसिस झालेल्या ठिकाणी लावा. आठवड्यातून 2 वेळा या तेलाने मालिश करा. सोरायसिसच्या लक्षणं कमी करण्यासाठी मदत होईल. 

या गोष्टी लक्षात ठेवा : 

- डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणताही साबण किंवा कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्सचा वापर करू नका. दुसऱ्यांचा टॉवेल, साबण आणि कपड्यांचा वापर करू नका. तसेच आपल्या गोष्टी इतरांना वापरण्यासाठी देऊ नका. 

- सोरायसिसपासून बचाव करण्यासाठी थंडीमध्ये आपली स्किन व्यवस्थित झाकली जाईल असे कपडे वेअर करा. जास्त थंडीमुळे त्वचेमध्ये खाज आणि वेदनांसारख्या समस्या उद्भवू शकतात. 

- थंडीमध्ये सोरायसिसच्या रूग्णांनी लोकरीच्या कपड्यांसोबतच कॉटनचे सुती कपडे वेअर केले पाहिजे. 

- मुबलक प्रमाणात ऊन न मिळाल्याने त्वचा ड्राय होऊ शकते. त्यामुळे सकाळच्या उन्हामध्ये वेळ घालवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 

- सोरायसिसच्या रूग्णांनी तणाव घेणं अत्यंत घातक ठरू शकतं. याव्यतिरिक्त थ्रोट इन्फेक्शन किंवा गळ्याच्या इन्फेक्शनपासून बचाव करा. 

- त्वचा अधिक कोरडी होण्यापासून बचाव करा, तसेच खाज येऊ नये. 

- परिणाम झालेल्या भागांवर खाज येत असेल तर इन्फेक्शनचा धोका असतो. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार