अंडरगारमेंट्समुळे होतात 'या' गंभीर समस्या, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 11:11 AM2019-12-07T11:11:05+5:302019-12-07T11:12:47+5:30

अंडरगारमेंट्सचा विषय निघाला की, सर्वांचं लक्ष आधी महिलांकडे जातं. घरातही महिला आपल्या अंडरगारमेंट्सबाबत अवघडल्यासारख्या वागताना किंवा लाजताना दिसतात.

Problems are caused undergarment in women and men | अंडरगारमेंट्समुळे होतात 'या' गंभीर समस्या, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात...

अंडरगारमेंट्समुळे होतात 'या' गंभीर समस्या, दुर्लक्ष कराल तर पडेल महागात...

Next

अंडरगारमेंट्सचा विषय निघाला की, सर्वांचं लक्ष आधी महिलांकडे जातं. घरातही महिला आपल्या अंडरगारमेंट्सबाबत अवघडल्यासारख्या वागताना किंवा लाजताना दिसतात. त्यामुळेच काही महिला या आपले अंडरगारमेंट्स खुल्या जागेत आणि उन्हात वाळत घालू शकत नाहीत. म्हणजे अंडरगारमेंट्सबाबत अनेकजण फारसे गंभीर बघायला मिळत नाहीत.

जर अंडरगारमेंट्स चांगल्याप्रकारे सुकले नाही तर त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळतं. पुरूषांना तर यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतोच पण महिलांना या समस्या अधिक होताता. त्यामुळे त्यांनी या समस्यांबाबत नेहमी जागरुक असावे. चला जाणून घेऊ काय होऊ शकतात याने नुकसान...

यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन

(Image Credit : medicalnewstoday.com)

सामान्यता ही लघवीमुळे होणारी समस्या असते. पण याचं मुख्य कारण हायजीन असतं. जर तुमचे अंडरगारमेंट्स चांगल्या प्रकारे स्वच्छ आणि सुकलेले नसतील तर यूटीआय होण्याचा धोका असतो. बॅक्टेरियामुळे होणारा हा आजार फारच धोकादायक असतो. यापासून वाचण्यासाठी अंडरगारमेंट्स चांगल्याप्रकारे स्वच्छ करा आणि उन्हामध्ये वाळत घाला. 

गर्भाशयात इन्फेक्शन

महिलांना नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमधून इन्फेक्शनची भिती असते. त्यामुळे त्यांना सतत काळजी घ्यावी लागते. महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होणारं इन्फेक्शन गर्भाशयामध्ये कोणत्याही रोगाला जन्म देऊ शकतं. हे फार घातक ठरु शकतं. 

स्कीन इन्फेक्शन

स्कीनमध्ये संक्रमण होण्याचं मुख्य कारण हायजीनची कमतरता असतं. जर कपडे पूर्णपणे सुकलेले नसतील ते थोडे ओले असतील तर इन्फेक्शनचा धोका वाढतो. प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूचू स्कीन फार सॉफ्ट आणि सेन्सिटीव्ह असते त्यामुळे इथे इन्फेक्शनची भीती जास्त असते. 

खाज येणे

(Image Credit ; wikihow.com)

स्कीनच्या आजारांमध्ये खाज येणे ही समस्या सर्वात खराब मानली जाते. एकदा खाज कुणाला झाली तर ती बरी होण्यास बराच वेळ घेते. याव्यतिरिक्त खाज ही एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर वेगाने पसरते.

किडनी स्टोन

तुम्हाला हे वाचून धक्का बसेल पण अंडरगारमेंट्समुळे किडनी स्टोन होण्याची शक्यताही असते. पण यामागचं कारण बॅक्टेरिया असतं. बॅक्टेरियामुळे इन्फेक्शन झाल्यास सर्वात पहिले ते लिव्हर आणि किडनीला कचाट्यात घेतं. त्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. 


Web Title: Problems are caused undergarment in women and men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.