शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

अशुद्ध पाणी आणि अस्वच्छतेमुळे हेपेटायटीसचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 10:50 AM

WHO नुसार दरवर्षी लाखो लोकांना हेपेटायटीसचं संक्रमण होतं आणि अनेक लोक या आजारामुळे आपला जीव गमावतात.

लिव्हरवर सूज येणे या समस्येला हेपेटायटीस असं म्हटलं जातं. WHO नुसार दरवर्षी लाखो लोकांना हेपेटायटीसचं संक्रमण होतं आणि अनेक लोक या आजारामुळे आपला जीव गमावतात. हेपेटायटीसचे व्हायरस हे ५ प्रकारचे असतात. हेपेटायटीस ए, बी, सी, डी आणि ई. यांमुळे लिव्हरला सूज येते आणि जळजळ होते. अनेकजा हेपेटायटीसमुळे लिव्हर फायब्रोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयी सांगणार आहोत, ज्या वेळीच बदलल्या नाही तर तुम्हाला हेपेटायटीस होऊ शकतो. 

अशुद्ध पाणी

हेपेटायटीसचे व्हायरस जास्त प्रमाणात पाण्याच्या माध्यमातून पसरतात. खरंतर याचे व्हायरस फार शक्तीशाली असतात जे सहजपणे नष्ट होत नाहीत. हे व्हायरस वेगाने वाढत राहतात. त्यामुळे अनेकदा ताजे फळ आणि भाज्यांच्या माध्यमातूनही हे व्हायरस व्यक्तीपर्यंत सहजपणे पोहोचू शकतात. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही फळं आणि भाज्या व्यवस्थित धुवून आणि शिजवून खाल्ल्या पाहिजे. कुठे गेलात तर पाण्याची बॉटल सोबत घेऊन जावे किंवा बाहेर केवळ फिल्टरचंच पाणी प्यावे.

हातांच्या संपर्काने

हेपेटायटीस ए चे व्हायरस हे शरीराच्या बाहेरही अनेक महिने जिंवत राहू शकतात. त्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी तुम्ही घ्यायला हवी. त्यासाठी हात नेहमी अॅंटी-बॅक्टेरिअल साबणाने, लिक्विड हॅडवॉश किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करावे. 

दुसऱ्यांचे मेकअप प्रॉडक्ट वापरू नका

कधीही दुसऱ्यांचे मेकअप प्रॉडक्ट वापरू नये. कारण या फारच पर्सनल वस्तू आहेत. जर त्या व्यक्तील हेपेटायटीस नसेलही तरी सुद्धा त्याच्या शरीरावर हेपेटायटीसचे व्हायरस असतील तर ते मेकअप प्रॉडक्ट, शॅम्पू, क्रीम यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. 

माशांच्या माध्यमातून

अनेकदा मासे अशाच संक्रमित पाण्यापासून पकडण्यात आलेल्या असतात, ज्यात मोठ्या प्रमाणात व्हायरस आणि बॅक्टेरिया असतात. अशात जर तुम्ही अर्धवट शिजवलेले किंवा कच्चे मासे खाल्ले किंवा त्यासोबत काही फळ किंवा भाज्या ठेवल्या तर यानेही व्हायरस पसरतात.  

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं, पचनप्रक्रीया सुरळीत होणं, रक्त शुद्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे डिटॉक्सीफिकेशन करण्याचं काम लिव्हर करतं. सध्याच्या धावपळीच्या आणि बदललेल्या जीवनशैलीमध्ये आरोग्याचा निरनिराळ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी लिव्हर फार महत्त्वाची भूमिका बजावतं. पण अनेकदा अनेक लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून येते. पण आता लिव्हरच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या उपयुक्त ठरतात, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. 

जेवणामध्ये मुबलक प्रमाणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्याचा धोका कमी होतो. ही बाब उंदरांवर करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झाली आहे. फॅटी लिव्हर अनेक व्यक्तीमध्ये आढळून येणारा एक साधारण आजार आहे. परंतु या आजाराकडे दुर्लक्ष केलं तर याचं रूपांतर लिव्हर फेल्यु लिव्हर सिरॉसिस आणि लिव्हर कॅन्सरसारख्या आजारांमध्ये होऊ शकतं. 

लिव्हर संदर्भातील या गंभीर आजारांचं सर्वात मोठं कारण म्हणजे लठ्ठपणा आणि मद्यपान करणं. हिरव्या पालेभाज्यांमध्ये इनऑर्गेनिक नायट्रेट असतं जे की, लिव्हरमध्ये फॅट जमा करण्यापासून रोखण्यास मदत करतं. स्वीडनचे असिस्टंट प्रोफेसर कार्लस्ट्रॉम यांनी सांगितले की, 'आम्ही ज्यावेळी उंदराला चरबीयुक्त आणि शुगर वेस्टर डाएट दिलं आणि त्याचवेळी त्यासोबत डायटरी नायट्रेटदेखील दिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की, त्यांच्या लिव्हरमध्ये कमी फॅट जमा झालं आहे.'

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य