शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

यशोधराच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा पोलिसांना टेन्शन : विविध संघटनांची निदर्शने

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

सोलापूर : गरिबांना जीवनदायीचा लाभ मिळालाच पाहिजे, यातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, जीवनदायीत समाविष्ट केलेल्या रुग्णांवर उपचार टाळणार्‍या यशोधराच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या घोषणांनी जेलरोड पोलिसांचे शुक्रवारी सकाळी टेन्शन वाढले. यशोधरा हॉस्पिटलच्या विरोधात विविध संघटनांनी प्रवेशद्वारावर निदर्शने केली.

सोलापूर : गरिबांना जीवनदायीचा लाभ मिळालाच पाहिजे, यातील भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, जीवनदायीत समाविष्ट केलेल्या रुग्णांवर उपचार टाळणार्‍या यशोधराच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, या घोषणांनी जेलरोड पोलिसांचे शुक्रवारी सकाळी टेन्शन वाढले. यशोधरा हॉस्पिटलच्या विरोधात विविध संघटनांनी प्रवेशद्वारावर निदर्शने केली.
जीवनदायी योजनेचे लाभार्थी असतानाही घोळ घालून, बिले वसूल करणार्‍या यशोधरा हॉस्पिटलच्या विरोधात एस. एफ. आय., डी. वाय. एम. आय. जनवादी महिला संघटना, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र विकास आघाडी, निर्मिती विचार मंच या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी व त्यांच्या हातातील फलकांमुळे लक्ष वेधले गेले. सुभाष म्हमाणे यांच्यावरील उपचार जीवनदायीत समाविष्ट असतानाही यशोधराच्या प्रशासनाने बेड शिल्लक नाहीत, आजार योजनेत बसत नाही असे कारण सांगून बिल वसूल केले. वास्तविक हॉस्पिटल धर्मादाय तत्वावर चालविण्याच्या अटीवर शासकीय जागा घेतलेली असताना यशोधरा प्रशासनाने व्यवसाय थाटला आहे. म्हमाणे यांना न्याय मिळालाच पाहिजे व जीवनदायीच्या रुग्णांना वेठीस धरणार्‍या डॉ. सुरेश मणुरे व हॉस्पिटलच्या प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. या मागणीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर आंदोलन झाल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. अत्यावश्यक सेवेत ही बाब येत असल्याने अत्यवस्थ रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी आंदोलन थोडक्यात उरकावे अशी पोलिसांनी कार्यकर्त्यांना विनंती केली. कार्यकर्त्यांनी विनंतीला मान देत आंदोलन उरकले. आंदोलनात एसएफआयचे राज्य सचिव दत्ता चव्हाण, जिल्हाध्यक्ष अशोक बल्ला, कॉ. युसूफ शेख, अनिल म्हमाणे, किशोर झेंडेकर, मीरा कांबळे, पूजा कांबळे, दाऊद शेख, बापू साबळे, अमोल केंदळे, विजय हरसुरे यांनी सहभाग नोंदविला.
इन्फो
शेत गहाण ठेवून उपचार
धन्यकुमार गायकवाड (वय ३0, रा. हत्तरसंग, ता. दक्षिण सोलापूर) हे मेंदूला सूज आल्याने उपचारास यशोधरामध्ये दाखल झाले होते. हा आजार जीवनदायीत येत नसल्याचे सांगून अडीच लाख बिल आकारले. नुसत्या ४३ वेळा रक्तचाचण्या केल्या. औषधे रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच घेण्यास भाग पाडले. शेत गहाण ठेवून त्यांनी बिल भरले. याबाबत भारिप बहुजन महासंघाचे विजयकुमार गायकवाड यांनी तक्रार केली आहे.
फोटोओळी
जीवनदायी योजनेत समाविष्ट रुग्णांवर उपचारास हयगय करणार्‍या यशोधरा हॉस्पिटल प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी निदर्शने करताना एसएफआयचे प्रदेश सचिव...