तुम्हाला 'हे' आजार असल्यास पेरुला हातही लावू नका, उलट वाढतील आजाराचे दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 04:31 PM2021-08-05T16:31:56+5:302021-08-05T16:34:13+5:30

पेरूची पाने खाल्ल्याने हृदय, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते . मात्र, त्यात काही गोष्टी आहेत ज्या 'या' आजारांच्या रुग्णांसाठी हानिकारक आहेत.

Patients of some diseases should not eat guava. know which are these diseases. know the side effects of guava | तुम्हाला 'हे' आजार असल्यास पेरुला हातही लावू नका, उलट वाढतील आजाराचे दुष्परिणाम

तुम्हाला 'हे' आजार असल्यास पेरुला हातही लावू नका, उलट वाढतील आजाराचे दुष्परिणाम

Next

पेरू हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. ज्यामध्ये कॅलरी खूप कमी आणि फायबर जास्त आहे. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरूचे फळच नव्हे तर त्याची पानेही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पेरूची पाने खाल्ल्याने हृदय, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते . मात्र, त्यात काही गोष्टी आहेत ज्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत.

पेरूमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. एका पेरूमध्ये ११२ कॅलरीज आणि २३ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स, ९ ग्रॅम फायबर आणि स्टार्चची नगण्य मात्रा असते. अभ्यासात असे सांगितले गेले की मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे. कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. यामध्ये फोलेट, बीटा कॅरेटिन सारखे पौष्टिक घटक असतात. जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पेरू खाणे टाळावे.

पोट फुगण्याची समस्या असणाऱ्यांनी
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्रुक्टोज असतात. या दोन गोष्टी जास्त घेतल्याने सूज येते. जर तुम्हाला पोट फुगण्याची समस्या असेल तर तुम्ही पेरु खाणे टाळावे. त्यात ४० टक्के फ्रुक्टोज असतात. जे शरीरात सहज शोषले जात नाहीत. यामुळे तुमची समस्या वाढू शकते. याशिवाय, झोपेच्या आधी लगेच पेरू खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

इरिटेबल बॉवेल सिंड्रोमने ग्रस्त व्यक्ती
पेरूमध्ये भरपूर फायबर असते. जे बद्धकोष्ठता दूर करते आणि पचन उत्तेजित करण्यास मदत करते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनसंस्थेला नुकसान होऊ शकते. विशेषत: जर तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोमचा त्रास होत असेल तर आपण पेरू खाणे टाळलेच पाहिजे.

मधुमेहाचे रुग्ण
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. तथापि, आहारात त्याचा समावेश करण्यासह, रक्तातील साखरेच्या पातळीवर विशेष लक्ष द्या. १०० ग्रॅम चिरलेल्या पेरूमध्ये ९ ग्रॅम नैसर्गिक साखर असते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने साखरेची पातळी वाढू शकते. म्हणूनच आपण कमी प्रमाणात खाणे महत्वाचे आहे.

पेरू खाण्याची योग्य वेळ
तुम्ही दिवसभरात पेरू कधीही खाऊ शकतो. एकापेक्षा जास्त पेरू खाऊ नयेत. वर्कआउटच्या आधी आणि नंतर तुम्ही हे फळ खाऊ शकता. रात्रीच्या वेळी हे फळ खाल्ल्याने सर्दी आणि कफ होऊ शकतो.

Web Title: Patients of some diseases should not eat guava. know which are these diseases. know the side effects of guava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.