शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

CoronaVirus News: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू; जाणून घ्या कधी लॉन्च होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 10:26 PM

लस घेतलेल्या स्वयंसेवकाच्या हाडांना सूज आल्यानं थांबली होती अंतिम टप्प्यातील चाचणी

लंडन: ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाच्या कोरोना चाचणीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीला ब्रिटनमध्ये पुन्हा सुरुवात झाली आहे. ब्रिटनच्या मेडिसिन्स हेल्थ रेग्युलेटरी ऑथरटीनं संपूर्ण तपासणी केल्यानंतर कोरोना लस सुरक्षित आढळून आली. त्यानंतर लसीच्या चाचणीला हिरवा कंदिल मिळाला. एका स्वयंसेवकावर लसीचा गंभीर परिणाम दिसून आल्यानं लसीची चाचणी रोखण्यात आली होती. कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होईल, असा विश्वास एस्ट्राजेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरियट यांनी व्यक्त केला. 'या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस उपलब्ध होईल. संपूर्ण जगाचं लक्ष या लसीच्या चाचण्यांकडे लागलं आहे. त्यामुळेच या लसीची इतकी चर्चा होत आहे,' असं सॉरियट यांनी म्हटलं.का रोखली होती लसीची चाचणी?एका स्वयंसेवकाला लस टोचल्यानंतर त्याच्या कमरेच्या हाडाला सूज आली. त्यामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी तातडीनं रोखण्यात आली. या टप्प्यात जवळपास ५० हजारांहून अधिक जणांना लस दिली गेली. सध्या चाचणी अंतिम टप्प्यात आहे. यानंतर सुरक्षितता आणि त्याचा प्रभाव याबद्दलच्या तपशीलाला मंजुरी मिळेल.भारतातही रोखण्यात आली होती चाचणी अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं तयार केलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी १७ ठिकाणी सुरू होती. पण डीसीजीआयनं नोटिस दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटनं चाचणी रोखण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्याबाबत तज्ज्ञांमध्येही सकारात्मक वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अमेरिकेसह ब्राझील, दक्षिण अमेरिका आणि भारतात होणार आहे. स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा स्वदेशी लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने मोठी घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. बायोटेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट देखील केलं आहे. माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली दिसून आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून कोवॅक्सीन विकसित करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिली महत्त्वाची माहितीकुठल्याही परिस्थितीत कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. कोरोनावरील लस विकसित करताना सर्व नियमांचे पालन केले गेले पाहिजे. तसेच लोकांना औषधे आणि लस देण्यापूर्वी त्याच्या सुरक्षिततेची तपासणी होणे आवश्यक आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या