CoronaVirus News: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू; जाणून घ्या कधी लॉन्च होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 10:26 PM2020-09-12T22:26:17+5:302020-09-12T22:29:47+5:30

लस घेतलेल्या स्वयंसेवकाच्या हाडांना सूज आल्यानं थांबली होती अंतिम टप्प्यातील चाचणी

oxford Covid Vaccine Astrazeneca Resumes Covid 19 Vaccine Trial After Uk Green Light | CoronaVirus News: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू; जाणून घ्या कधी लॉन्च होणार

CoronaVirus News: ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू; जाणून घ्या कधी लॉन्च होणार

Next

लंडन: ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाच्या कोरोना चाचणीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीला ब्रिटनमध्ये पुन्हा सुरुवात झाली आहे. ब्रिटनच्या मेडिसिन्स हेल्थ रेग्युलेटरी ऑथरटीनं संपूर्ण तपासणी केल्यानंतर कोरोना लस सुरक्षित आढळून आली. त्यानंतर लसीच्या चाचणीला हिरवा कंदिल मिळाला. एका स्वयंसेवकावर लसीचा गंभीर परिणाम दिसून आल्यानं लसीची चाचणी रोखण्यात आली होती. 

कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होईल, असा विश्वास एस्ट्राजेनेकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरियट यांनी व्यक्त केला. 'या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस उपलब्ध होईल. संपूर्ण जगाचं लक्ष या लसीच्या चाचण्यांकडे लागलं आहे. त्यामुळेच या लसीची इतकी चर्चा होत आहे,' असं सॉरियट यांनी म्हटलं.

का रोखली होती लसीची चाचणी?
एका स्वयंसेवकाला लस टोचल्यानंतर त्याच्या कमरेच्या हाडाला सूज आली. त्यामुळे ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी तातडीनं रोखण्यात आली. या टप्प्यात जवळपास ५० हजारांहून अधिक जणांना लस दिली गेली. सध्या चाचणी अंतिम टप्प्यात आहे. यानंतर सुरक्षितता आणि त्याचा प्रभाव याबद्दलच्या तपशीलाला मंजुरी मिळेल.

भारतातही रोखण्यात आली होती चाचणी 
अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं तयार केलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी १७ ठिकाणी सुरू होती. पण डीसीजीआयनं नोटिस दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटनं चाचणी रोखण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्याबाबत तज्ज्ञांमध्येही सकारात्मक वातावरण आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अमेरिकेसह ब्राझील, दक्षिण अमेरिका आणि भारतात होणार आहे. 

स्वदेशी लसीची प्राण्यांवर यशस्वी चाचणी, भारत बायोटेकची घोषणा 
स्वदेशी लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाली आहे. भारत बायोटेक कंपनीने मोठी घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लाईव्ह व्हायरल चॅलेंज मॉडेलमध्ये प्राण्यांवर केलेल्या प्रयोगात ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. बायोटेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट देखील केलं आहे. माकडांवर केलेल्या लशीच्या प्रयोगानंतर त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली दिसून आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर मिळून कोवॅक्सीन विकसित करत आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने दिली महत्त्वाची माहिती
कुठल्याही परिस्थितीत कोरोना लसीच्या सुरक्षिततेबाबत तडजोड केली जाणार नाही असे डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. कोरोनावरील लस विकसित करताना सर्व नियमांचे पालन केले गेले पाहिजे. तसेच लोकांना औषधे आणि लस देण्यापूर्वी त्याच्या सुरक्षिततेची तपासणी होणे आवश्यक आहे. 

Web Title: oxford Covid Vaccine Astrazeneca Resumes Covid 19 Vaccine Trial After Uk Green Light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.