शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

ऑनलाइन शॉपिंग करण्याची सवय असेल तर वेळीच व्हा सावध, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 10:36 AM

अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ग्राहकांना आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या ऑफर आणि डिस्काऊंट देत आहेत.

(Image Credit : vt.co)

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील किंवा इतरही अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट ग्राहकांना आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या ऑफर आणि डिस्काऊंट देत आहेत. बरं हे केवळ फेस्टिव सीझनमधेच नाही तर ऑफ सीझनमध्ये या ऑफर दिल्या जातात. हेच कारण आहे की, मोठ्या संख्येने लोक ऑनलाइन शॉपिंगला महत्व देत आहे. आता तर अशा लोकांची संख्या खूप वाढलीये, ज्यांच्यासाठी ऑनलाइन शॉपिंग करणं एक सवय झाली आहे. पण यावर एक्सपर्ट्सचं मत आहे की, ऑनलाइन शॉपिंगची सवय एक प्रकारचा मानसिक आजार आहे. 

(Image Credit : womenshealth.com.au)

तुम्हाला ही गंमत वाटेल. पण ही गंमत नसून मोठ्या प्रमाणात लोक या ऑनलाइन शॉपिंगच्या शॉपिंगच्या सवयीपासून सुटका मिळवण्यासाठी ट्रीटमेंट घेत आहेत. अशाच १२२ लोकांची टेस्ट केली गेली. त्यातील ३४ लोकांना ऑनलाइन शॉपिंगचं अ‍ॅडिक्शन प्रमाणापेक्षा जास्त होतं. ज्यामुळे त्यांच्यात एंग्जायटी म्हणजे अस्वस्थता आणि डिप्रेशनची लक्षणेही दिसत होते. 

जर्मनीच्या हॅनोवर मेडिकल स्कूलच्या वैज्ञानिकांनुसार, आता वेळ आली आहे की, बाईंग शॉपिंग डिसऑर्डर म्हणजेच BSD ला वेगळ्या प्रकारे क्लासीफाय केलं जावं. सोबतच याला एक वेगळी मेंटल हेल्थ कंडिशन ठरवून याबाबत आणखी माहिती एकत्र केली जावी. 

२० पैकी एकाला आहे बीएसडी

कॉम्प्रिहेंसिव सायकायट्री नावाच्या जर्नममध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, विकसित देशांमध्ये साधारण ५ टक्के लोक असे आहेत, ज्यांना बाईंग शॉपिंग डिसऑर्डरची सवय लागलीये. जगभरात प्रत्येक २० पैकी एक व्यक्ती याने प्रभावित आहे. यातील प्रत्येकी तीनपैकी एका व्यक्तीला ऑनलाइन शॉपिंग करण्याची सवय लागली आहे. 

वैज्ञानिकांनुसार, बीएडीने पीडित व्यक्तीला शॉपिंग करण्याची तीव्र इच्छा होऊ लागते. या आजाराने पीडित व्यक्ती जेवढं त्याला परवडतं, त्यापेक्षा अधिक खरेदी करतो. या कारणाने व्यक्तीला पैशांची कमतरता भासते. परिवारात समस्या होऊ लागतात आणि घरात विनाकामाच्या वस्तू जमा होऊ लागतात.

वैज्ञानिकांना आशा आहे की, त्यांचा हा रिसर्च आणि याच्या निष्कर्षातून मेंटल हेल्थ एक्सपर्ट्सना प्रोत्साहन मिळेल आणि ते बीएसडीच्या या स्थितीबाबत आणखी माहिती मिळवतील. दुसरीकडे रिसर्चमधून हे सांगितलं गेलं असलं तरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने शॉपिंगला मेंटल हेल्थ कंडिशनमधे ठेवलेलं नाहीये. तर व्हिडीओ गेम अ‍ॅडिक्शन आणि जुगार खेळण्याच्या अ‍ॅडिक्शनला मेंटल हेल्थ कंडिशनमधे ठेवलं आहे. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यResearchसंशोधनHealthआरोग्य