आता कोरोनाशी लढण्यासाठी एक तृतीयांश लोकसंख्या सक्षम; संशोधनातून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:29 PM2020-07-03T12:29:36+5:302020-07-03T12:50:08+5:30

CoronaVirus News : एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी सक्षम आहे. कारण सध्या लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीचा विकास व्हायला सुरूवात झाली आहे. टी सेल्समुळे असा बदल दिसून येत आहे.

One third of population are able to fight with coronavirus claims recent research of sweden | आता कोरोनाशी लढण्यासाठी एक तृतीयांश लोकसंख्या सक्षम; संशोधनातून मोठा खुलासा

आता कोरोनाशी लढण्यासाठी एक तृतीयांश लोकसंख्या सक्षम; संशोधनातून मोठा खुलासा

Next

कोरोना संक्रमणाच्या वाढत्या केसेसमुळे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त आहे. तर जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटींपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. स्वीडनमधील कॅरोलिंस्का इंस्टीट्यूटच्या वैज्ञानिकांनी संशोधनातून दावा केला आहे की, एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनाविरोधात लढण्यासाठी सक्षम आहे. कारण सध्या लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीचा विकास व्हायला सुरूवात झाली आहे. टी सेल्समुळे असा बदल दिसून येत आहे.

एका संशोधनात तज्ज्ञांनी निरोगी रक्तदात्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण केले. मानवी शरीर कोरोना व्हायरसचा सामना कशाप्रकारे करते. हे या संशोधनातून पाहण्यात आले होते. शरीरातील टी सेल्स  एंटीबॉडी तयार करण्यासाठी फायदेशीर ठरतात. टी सेल्स शरीरातील पांढऱ्या पेशींप्रमाणे असतात. ज्याद्वारे शरीराला व्हायरसशी लढण्यासाठी क्षमता वाढतअसते.

संशोधकांनी सांगितले की,  दुप्पट लोकसंख्येत सध्या कोरोनाशी लढण्यासाठी क्षमता विकसित झाली आहे. म्हणजेच ३० टक्के लोकांमध्ये कोरोना व्हायरसशी लढण्याची क्षमता विकसित झाली आहे. एंटीबॉडी आणि टी सेल्स कोरोना व्हायरसशी लढण्याासाठी फायदेशीर ठरत आहेत. एंडीबॉडीच्या तुलनेत सर्वाधिक लोकांच्या शरीरात टी सेल्सचे सुरक्षा कवच तयार झाले आहे. या संशोधनातील प्रमुख तज्ज्ञ मार्कस बगर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार टी सेल्स कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्तीला मजबूत बनवतात.

शरीरात एंटीबॉडी विकसित झाल्यानंतर जवळपास सहा ते तीन महिने कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो. बगर्ट यांनी ब्रिटनमध्ये झालेल्या एंटीबॉडी चाचणीचे उदाहरण देत सांगितले की, देशभरात फक्त ७ टक्के लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी एंटीबॉडीज् विकसित झाल्या आहेत. लंडनमध्ये हा आकडा १७ टक्क्यांपर्यंत आहे.तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार टी सेल्स तयार झाल्यानंतर व्यक्ती सार्स कोविड19 च्या संपर्कात व्यक्ती आल्यास कोरोनाचा जास्त परिणाम दिसून येणार नाही.

मेड इन इंडिया! अखेर भारताने 'अशी' तयार केली कोरोनाचा खात्मा करणारी लस

मोठा दिलासा! मानवी चाचणीत कोरोना लसीचे सकारात्मक परिणाम; कधी तयार होणार लस, जाणून घ्या

Web Title: One third of population are able to fight with coronavirus claims recent research of sweden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.