टल्ली होईपर्यंत केल्या जाणाऱ्या मद्यसेवनावर ठेवता येणार कंट्रोल,एका खास डोजची असेल गरज....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 10:32 AM2019-11-29T10:32:25+5:302019-11-29T10:43:14+5:30

अनेकदा असं पाहिलं जातं की, एकदा की दारू प्यायला कुणी बसले तर पार टल्ली होईपर्यंत म्हणजे धड उभंही राहता येत नाही तोपर्यंत पित बसतात. काही लोकांना हे नंतर जाणवतं सुद्धा की, इतकी प्यायला नको होती.

One-off ketamine dose may reduce heavy drinking, say scientists | टल्ली होईपर्यंत केल्या जाणाऱ्या मद्यसेवनावर ठेवता येणार कंट्रोल,एका खास डोजची असेल गरज....

टल्ली होईपर्यंत केल्या जाणाऱ्या मद्यसेवनावर ठेवता येणार कंट्रोल,एका खास डोजची असेल गरज....

googlenewsNext

(Image Credit : thestatesman.com)

अनेकदा असं पाहिलं जातं की, एकदा की दारू प्यायला कुणी बसले तर पार टल्ली होईपर्यंत म्हणजे धड उभंही राहता येत नाही तोपर्यंत पित बसतात. काही लोकांना हे नंतर जाणवतं सुद्धा की, इतकी प्यायला नको होती. अशा लोकांना त्यांच्या टल्ली होईपर्यंत पिण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवायचं असतं. पण इच्छा असूनही ते तसं करू शकत नाही. मात्र, अशा लोकांसाठी वैज्ञानिकांनी एक खास उपाय शोधून काढलाय.

काय आहे हा खास उपाय?

वैज्ञानिकांना एका प्रयोगात असं आढळून आलं की, केटामाइनचा एक डोज घेतल्यावर जास्त दारू पिण्याची सवय असलेले लोक त्यांची ही जास्त पिण्याची सवय कंट्रोल करू शकतात. केटामाइन एक असा पदार्थ आहे, जो एका सेडटिव्हप्रमाणे काम करतो. म्हणजे वेदना किंवा एखादी खास समस्या दूर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधासारखं काम करते. त्यामुळेच याला पार्टी ड्रग म्हणून ओळखलं जातं.

फक्त एक डोज

(Image Credit : drugrehab.com)

वैज्ञानिकांना आढळलं की, केटामाइनचा एका डोज घेतल्यानंतर फार जास्त मद्यसेवन करणाऱ्या लोकांमध्ये मद्यसेवन करण्याची इच्छा ५० टक्के कमी होते. म्हणजे आधी ते एकाचवेळी जेवढी दारू पित होते, आता ती या डोजनंतर अर्धी होईल. केटामाइनचा हा प्रभाव पाहून वैज्ञानिक फारच उत्साहीत आहेत. त्यांचं मत आहे की, केटामाइनचा हा प्रभाव केवळ मद्यसेवनाच्या सवयीवरच नाही तर इतरही व्यसन असलेल्या लोकांवरही होऊ शकतो. 

९० लोकांवर रिसर्च

(Image Credit : irishmirror.ie)

हा रिसर्च जर्नल नेचरमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. वैज्ञानिकांनी त्यांच्या रिसर्चसाठी ९० लोकांची निवड केली होती. जे एका आठवड्यात बीअरच्या कमीत कमी ३० बॉटल पित होते. पण या लोकांनी कधीच या सवयीतून बाहेर पडण्यासाठी उपचार घेतले नाहीत. या लोकांवर ९ महिने रिसर्च करण्यात आला.

काय म्हणाले वैज्ञानिक?

(Image Credit : illinoisalcoholrehabs.wordpress.com)

रिसर्चदरम्यान ज्या लोकांना केटामाइनचा डोज देण्यात आला होता, त्या लोकांचं पिण्याचं प्रमाण ९० दिवसांनंतर ५० टक्के कमी झालं. या रिसर्चचे मुख्य लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडनचे मानसोपचारतज्ज्ञ रविदास यांच्यानुसार, अनेक लोक नशेची औषधे आणि मद्यसेवन करण्याचं कारण म्हणजे त्यांना त्यांच्या मेंदूच्या रिवॉर्ड लर्निंग सिस्टीमला अधिक एक्सप्लॉइट करायचं असतं. असं होण्याचं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एखाद्या पदार्थाच्या माध्यमातून एखाद्या खास रूपात निसर्गासोबत जुळायचं असतं आणि जेव्हा ते या पदार्थांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांना हे पदार्थ सेवन करण्याची तीव्र इच्छा होते.

दास म्हणाले की,  हा एक फार सकारात्मक शोध आहे. ज्यावर आणखी काम करण्याची गरज आहे. येत्या काळात आम्ही यासंबंधी एखादी प्रभावी टेक्निक विकसित करण्यात यशस्वी होऊ. ज्याने जास्त मद्यसेवन करणाऱ्यांना त्यांची सवय सोडवण्यास मदत मिळेल.


Web Title: One-off ketamine dose may reduce heavy drinking, say scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.