प्रेशर येऊनही पोट साफ होत नसेल तर करा 'हा' सोपा उपाय, काही मिनिटात व्हाल हलके!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:49 IST2024-11-29T11:47:56+5:302024-11-29T11:49:11+5:30
Constipation : भरपूर लोक पोट साफ होण्यासाठी जोर लावतात. पण असं करणं घातक ठरू शकतं. असं केल्याने मांसपेशींवर दबाव पडतो आणि पाइल्सची समस्या होते.

प्रेशर येऊनही पोट साफ होत नसेल तर करा 'हा' सोपा उपाय, काही मिनिटात व्हाल हलके!
Constipation : बद्धकोष्ठता हा एक क्रॉनिक डिजीज आहे. जो हळूहळू वाढतो. या आजारात अनेकदा टॉयलेटला जाऊनही पोट साफ होत नाही आणि काही लोक असेही असतात ज्यांना प्रेशर तर येतं पण पोट साफ होत नाही. अशात भरपूर लोक पोट साफ होण्यासाठी जोर लावतात. पण असं करणं घातक ठरू शकतं. असं केल्याने मांसपेशींवर दबाव पडतो आणि पाइल्सची समस्या होते.
आयुर्वेदात बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यानंतर टॉयेलटमध्ये जोर लावण्याची गरज पडत नाही आणि पोटही आरामात साफ होतं. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी यावर एक सोपा उपाय सांगितला आहे.
पोट साफ होण्याचा उपाय
पोट लगेच साफ होऊन हलकं वाटण्यासाठी तुम्हाला १ चमचा तूप, अर्धा चमचा मीठ आणि एक कप पाणी लागेल. तर १ ते दीड कप कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा तूप टाका. त्यात अर्धा चमचा मीठ टाकून चांगलं मिक्स करा. आता हे एक एक घोट घेत सेवन करा.
न्यूट्रिशनिस्टने सांगितलं की, हा उपाय रात्री जेवणानंतर १ तासांनी करणं अधिक फायदेशीर ठरेल. याने अन्न पचन होण्यास मदत मिलेल आणि आतड्याही सैल होतील. जेव्हा तुम्ही सकाळी टॉयलेटमध्ये जाल तर जास्त वेळ बसून राहण्याची गरज पडणार नाही.
तूप ठरतं फायदेशीर
तुपामुळे शरीरातील आतड्या सैल आणि चोपड्या होतात. ल्यूब्रिकेशननंतर पोट साफ होण्यात आतड्यांना जास्त मेहनत करावी लागत नाही. यामुळेच हिवाळ्यात भारतात जेवणात तूप खाण्याची परंपरा आहे.
कोमट पाण्याचे फायदे
विष्ठा कोरडी आणि टणक असेल तर पोट साफ होण्यास समस्या होते. ड्राय स्टूल बाहेर येत असताना गुदद्वारातील मांसपेशींना इजा होऊ शकते. याने इन्फेक्शन किंवा पाइल्सचाही धोका वाढतो. गरम पाण्याने विष्ठा मुलायम होते आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय बाहेर येते.