कोरोना विषाणूंचा धोका 'या' गोष्टीमुळे ८० टक्क्यांनी होईल कमी, तज्ज्ञांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 04:21 PM2020-05-14T16:21:52+5:302020-05-14T16:32:40+5:30

संशोधकांच्या टीमने व्हायरसचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडेल्सचा प्रयोग केला आहे.

New study shows that this one thing could decrease covid19 cases myb | कोरोना विषाणूंचा धोका 'या' गोष्टीमुळे ८० टक्क्यांनी होईल कमी, तज्ज्ञांचा खुलासा

कोरोना विषाणूंचा धोका 'या' गोष्टीमुळे ८० टक्क्यांनी होईल कमी, तज्ज्ञांचा खुलासा

Next

कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे होत असले तरी एकिकडे कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनात तज्ञांनी दावा केला आहे की, एका खास उपायामुळे कोरोनाला रोखता येऊ शकतं. संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय टीमने व्हायरसचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडेल्सचा प्रयोग केला आहे. अनेक देशात लॉकडाऊन  संपवण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहेत. 

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तज्ज्ञ एकाच गोष्टींवर ठाम आहेत. ती म्हणजे मास्क घालणे आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन करणं. माध्यामांनी दिलेल्या रिपोर्टनुसार व्हाईट हाऊसमधील सर्व कर्मचारी वर्गाला मास्कचा वापर करणं अनिवार्य केलं आहे. हा रिसर्च कॅलिफोर्निया युनिव्हरसिटीमधील आंतराराष्ट्रीय कॉम्प्यूटर सायन्स संस्था आणि हॉंगकॉंग विद्यापीठातील मॉडेलवर करण्यात आला होता.

या रिसर्चनुसार ६ मार्चला जपानमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे २१ लोकांचा मृत्यू झाला होता. तर अमेरिकेत कोरोनामुळे २ हजार १२९ लोकांचा मृत्यू झाला  होता. म्हणजे मृतांची संख्या १० पट जास्त होती.  एकिकडे संपूर्ण कोरोनाच्या विळख्यात अडकत चालला आहे. मात्र जपानमध्ये कोरोनाची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याचं कारण म्हणजे जपानमध्ये मास्क घालण्याची संस्कृती सुरूवातीपासूनच आहे.

अर्थशास्त्र तज्ञ तसंच या रिसर्समध्ये सहभागी असणारे इकोलो गुएरे यांनी सांगितले की, फक्त मास्क आणि सोशल डिस्टेंसिंग असा उपाय आहे. ज्यामुळे कोरोनाला हरवता येऊ शकतं. जोपर्यंत कोणतीही  लस किंवा औषध येत नाही. तोपर्यंत कोरोनाशी लढण्यासाठी हा प्रभावी उपाय ठरेल.  

(व्यसनांमुळे नाही तर 'या' २ कारणांमुळे पुरूषांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त)

(फक्त आहारच नाही तर 'या' कारणांमुळे घरबसल्या वाढतंय कॉलेस्ट्रॉल, 'असं' करा कंट्रोल)

Web Title: New study shows that this one thing could decrease covid19 cases myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.