शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

चहा चपाती खाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, टेन्शन फ्री राहण्याचा उत्तम मार्ग; सांगतोय खुद्द नीरज चोप्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 7:29 PM

सध्या नीरज चोप्रा एका सोशल मिडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. यात नीरजने टेन्शन फ्री राहण्याचा उपाय सांगितला आहे. नीरजने सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला, ज्या फोटोमध्ये त्यांने तणावापासून मुक्ती कशी मिळवायची, याचा साधा-सोपा उपाय सांगितला.

टोकिओ ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे देशातच नाही तर परदेशातही त्याचे लाखो चाहते तयार झाले आहेत. नीरज सोशल मीडियावरही चांगलाच अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या नीरज त्याच्या एका सोशल मिडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. यात नीरजने टेन्शन फ्री राहण्याचा उपाय सांगितला आहे.

नीरज चोप्राने सोमवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला, ज्या फोटोमध्ये त्यांने तणावापासून मुक्ती कशी मिळवायची, याचा साधा-सोपा उपाय सांगितला. हा उपाय आहे चहा चपाती. होय तुम्ही बरोबर ऐकताय! तुम्ही स्वत:च पाहु शकता की, या फोटोमध्ये नीरजने एका हातात चपाती आणि दुसऱ्या चहाचा ग्लास पकडलेला आहे. नीरज चोप्राने या फोटोवर कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, खाओ रोटी, पिओ चाय, टेंसन को करो बाय-बाय, म्हणजेच चहा प्या, चपाती खाली आणि टेन्शनला बाय बाय करा. नीरजची ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे. हा फोटो पाहुन नीरजचे चाहते त्याच्या साधेपणावप फिदा झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक हा फोटो लाईक आणि शेअर करतायत. या फोटोवरतर कमेंट्सचा पाऊस पडतोय.

सोबतच शिळी चपाती खाण्याचे फायदे जाणून घेऊ

१. आपण बऱ्याचदा पाहतो की, घरातील पोळी शिळी झाली की, काही लोक कचऱ्यात फेकून देतात.मात्र, पोळी जेव्हा शिळी होते, तेव्हा ती खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. शिळी पोळी खाणं हे तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतं. त्यामुळे शिळी पोळी टाकून देणं बंद करा. याचा उपयोग तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट म्हणूनदेखील करू शकता.

२. आपल्यापैकी काही व्यक्तींना थोडंसं काम केलं तरी थकायला होतं. अशा व्यक्तींसाठी शिळी पोळी म्हणजे एनर्जी बूस्टरचं काम करते. वास्तविक या पोळीमध्ये कार्बोहायड्रेड्स असतात जे तुमच्या शरीरातील कमतरता पूर्ण करतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला लगेज एनर्जी मिळते आणि तुम्हाला उत्साही वाटतं.

३. शिळी पोळी खाल्ल्यास तुम्हाला पचनक्रियेची कोणतीही समस्या उद्भवत नाही. तुम्हाला पोटासंबंधित कोणताही आजार अर्थात पोटात सतत गॅस निर्माण होणं, पोट फुगणं असं काही जाणवत असेल तर त्यावर शिळी पोळी हा एक रामबाण उपाय आहे. शिळ्या पोळीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे पोटासंबंधित आजार दूर होतात.

४. तुमचं वजन जर खूप वाढत असेल आणि तुम्ही त्यामुळे त्रस्त असाल तर त्यावर शिळी पोळी खाणं हा चांगला पर्याय आहे. शिळी पोळी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी व्हायला मदत होते. तसंच तुमचं मेटाबॉलिजम व्यवस्थित राहातं. यामुळे तुमचं तुमच्या भूकेवर नियंत्रण राहून वजनदेखील नियंत्रणात राहातं. 

५. शिळ्या पोळीत असणारे प्रोटीन आणि कॅल्शियम हे घटक हाडांना मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. शिळी पोळी खाल्ल्याने तुमची हाडं मजबूत आणि लवचिक राहतात.

 

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सNeeraj Chopraनीरज चोप्रा