नवजोत सिंह सिद्धू यांनी ५ महिन्यात कमी केलं ३३ किलो वजन, 'हे' ५ नियम केले फॉलो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:00 IST2025-01-30T10:59:58+5:302025-01-30T11:00:54+5:30

Navjot Singh Sidhu Weight Loss Tips: नवजोत सिंह सिद्धू यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं की, त्यांनी ५ महिन्यांमध्ये तब्बल ३३ किलो वजन कमी केलं.

Navjot Singh Sidhu loses 33 kilos, shares before and after pictures | नवजोत सिंह सिद्धू यांनी ५ महिन्यात कमी केलं ३३ किलो वजन, 'हे' ५ नियम केले फॉलो!

नवजोत सिंह सिद्धू यांनी ५ महिन्यात कमी केलं ३३ किलो वजन, 'हे' ५ नियम केले फॉलो!

Navjot Singh Sidhu Weight Loss Tips: माजी क्रिकेट खेळाडू आणि आपल्या कॉमेंट्रीसाठी लोकप्रिय नवजोत सिंह सिद्धू सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. काही दिवसांआधीच त्यांच्या पत्नीनं कॅन्सरला मात दिल्याची चर्चा चांगली रंगली. त्यांनी कॅन्सरला कसं हरवलं याची माहिती त्यांनी शेअर केली होती. आता नवजोत सिंह सिद्धू यांनी काही महिन्यातच भरपूर वजन कमी केल्यानं ते चर्चेत आहेत. 

सिद्धू यांनी वजन केलं कमी

नवजोत सिंह सिद्धू यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं की, त्यांनी ५ महिन्यांमध्ये तब्बल ३३ किलो वजन कमी केलं. त्यांनी त्यांचा वजन कमी करण्याआधीचा आणि नंतर फोटोही शेअर केला आहे. तसेच त्यांनी वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो केल्या त्याही सांगितल्या. अशात त्यांनी वजन कमी करण्यासाठी काय केलं ते जाणून घेऊ. जेणेकरून तुम्हाला वजन कमी करण्यासाठी या गोष्टी कामात पडतील.

वजन कमी करण्याचा फंडा

१) इच्छाशक्ती 

कोणतंही काम करण्यासाठी आधी आपल्याला आपल्या मेंदुला त्यासाठी तयार करावं लागतं. जर इच्छाशक्ती मजबूत असेल तर कितीही अवघड काम सहजपणे पूर्णत्वास नेता येतं. 

२) शिस्त

प्रत्येकाच्या जीवनात शिस्त असणं फार गरजेचं असतं. वजन कमी करणं असो वा आणखी कोणतं काम करणं असो ते पूर्ण करण्यासाठी शिस्त खूप महत्वाची ठरते. शिस्त असेल तरच कोणतंही काम सहजपणे पार पाडता येतं.

३) वॉक 

चालणं ही एक परिपूर्ण एक्सरसाईज मानली जाते. वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल खूप महत्वाची ठरते. त्यामुळे पायी चालणं वजन कमी करण्यासाठी सगळ्यात सोपी आणि फायदेशीर एक्सरसाईज आहे.

४) प्राणायाम

श्वासासंबंधी हा व्यायाम केल्यास शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. प्राणायाम नियमितपणे केल्यास शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

५) डाएट

वजन कमी करण्यासाठी योग्य आहार घेणं फार महत्वाचं ठरतं. हेल्दी आणि संतुलित आहार घेतल्यास वजन कमी करण्याची प्रोसेस अधिक सोपी होते.
नवजोत सिंह सिद्धू यांनी ऑगस्ट महिन्या हे नियम फॉलो करणं सुरू केलं होतं. त्यानंतर ५ महिन्यात त्यांनी त्यांचं ३३ किलो वजन कमी केलं. 
 

Web Title: Navjot Singh Sidhu loses 33 kilos, shares before and after pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.