शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

तणावामुळे अनेक शारिरीक गंभीर समस्या निर्माण होतात, वेळीच करा हे नैसर्गिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 12:58 PM

शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनच्या स्रावामुळे तणाव निर्माण होतो. इतर अनेक कारणांमुळे तणाव वाढतो. ती कारणे, लक्षणे आणि तणावावर मात करण्याचे काही मार्ग (Natural Ways to Relieve Stress) जाणून घेऊया.

आजकाल बहुतेक लोक तणावाखाली राहतात. छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेतात. आज लोक ज्या प्रकारच्या जीवनशैली जगतात, त्यात तणाव येणं ही एक सर्वसामान्य समस्या बनत चालली आहे. काहींना कामाच्या दडपणामुळे तणाव असतो, तर काहींना कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती, नोकरी गमावणे, नोकरी न मिळण्याचा ताण, दैनंदिन जीवनातील समस्या, कोणतीही अप्रिय घटना घडणे, प्रिय व्यक्ती गमावणे इत्यादी समस्या देखील कारणीभूत ठरू शकतात. ताण-ताणतणाव आपल्याला फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही हळूहळू आजारी बनवू शकतो. तणावावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर नैराश्य येऊ शकते. शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनच्या स्रावामुळे तणाव निर्माण होतो. इतर अनेक कारणांमुळे तणाव वाढतो. ती कारणे, लक्षणे आणि तणावावर मात करण्याचे काही मार्ग (Natural Ways to Relieve Stress) जाणून घेऊया.

तणावामुळे होते काय?StylesAtlife मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, प्रत्येकाचा ताण वेगवेगळा असू शकतो, काहींना कौटुंबिक समस्यांबद्दल, काहींना आरोग्य, ऑफिसच्या कामाचा किंवा मित्रांपासून विभक्त झाल्यामुळे किंवा दूर जाण्याचा तणाव असू शकतो. इतर अनेक कारणांमुळे देखील तणाव निर्माण होतो, ती कारणे खालील प्रमाणे आहेत-

  • नोकरी गेल्यामुळे पदोन्नतीऐवजी पदावनती
  • वैवाहिक जीवनात वाद, भांडणे, घटस्फोट
  • एखाद्या प्रिय व्यक्तीच्या अचानक मृत्यूमुळे किंवा गंभीर आजारामुळे तणाव
  • जुनाट आजार, शारीरिक इजा
  • भावनिकदृष्ट्या चिंताग्रस्त असणे
  • समवयस्कांचा दबाव, गुंडगिरी
  • नोकरीतून निवृत्ती, एकटेपणा
  • आर्थिक टंचाई
  • तणावाची लक्षणे
  • उत्साह कमी होणे, थकवा येणे
  • डोकेदुखी, निद्रानाश
  • चिडचिड
  • शरीर आणि स्नायू दुखणे
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण
  • तणावामुळे नैराश्य
  • वारंवार सर्दी, इन्फेक्शन
  • उच्च रक्तदाब, हृदयविकार
  • वेगवान हृदयाचे ठोके, छातीत दुखणे
  • वर्तन बदल
  • पोटदुखी, जुलाब, बद्धकोष्ठतेची समस्या
  • छातीत जळजळ
  • वजन वाढणे किंवा कमी होणे
  • मूड स्विंग, चिंता

तणाव दूर करण्याचे नैसर्गिक मार्गजर तुम्ही तणावग्रस्त असाल तर तुम्ही दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे. यासाठी तुम्ही फिरायला जा, कोणताही खेळ खेळा. घराबाहेर पडणे आणि ताज्या हवेत फिरायला जाणे यामुळे तणाव कमी होतो. तुम्हाला आतून बरे वाटू शकतं.

योगासने आणि ध्यानधारणा करूनही तणाव कमी करता येतो. मन शांत करण्यासाठी योग आणि ध्यान ही उत्तम तंत्रे आहेत. यामुळे मनाला शांती मिळते. आपल्या नित्यक्रमात १५ ते २० मिनिटे योग आणि ध्यान नक्की करा. त्यामुळे रोज येणार्‍या समस्यांमधील तणाव दूर होण्यास मदत होते. तसेच योगासने केल्याने तुम्ही इतर अनेक शारीरिक समस्या देखील टाळू शकता.

दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप घ्या. कमी झोप आणि विश्रांतीचा अभाव यामुळेही तणावाची पातळी वाढू शकते. सतत थकवा जाणवल्याने तणावाची मानसिक लक्षणे वाढतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स