'या' औषधी वनस्पती ठरतायत गंभीर आजारांवर रामबाण! कोरोनाकाळातील उत्तम इम्युनिटी बुस्टर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:02 PM2021-09-15T13:02:09+5:302021-09-15T13:02:54+5:30

कोरोनाच्या काळात लोकांना रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व कळाले आहे. या काळात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी आपण आहारामध्ये काही औषधी वनस्पतींचा समावेश केला पाहिजे. 

natural herbs to increase immunity, benefits of natural herbs in daily life | 'या' औषधी वनस्पती ठरतायत गंभीर आजारांवर रामबाण! कोरोनाकाळातील उत्तम इम्युनिटी बुस्टर

'या' औषधी वनस्पती ठरतायत गंभीर आजारांवर रामबाण! कोरोनाकाळातील उत्तम इम्युनिटी बुस्टर

Next

आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत. आरोग्याबाबत थोडीसा निष्काळजीपणा हानिकारक ठरू शकतो. कोरोनाच्या काळात लोकांना रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व कळाले आहे. या काळात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी आपण आहारामध्ये काही औषधी वनस्पतींचा समावेश केला पाहिजे. 

जर्दाळू
जर्दाळू हे जीवनसत्वे आणि खनिजांचे मुख्य स्त्रोत आहे. जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. या फळातील पौष्टिक घटक कर्करोग,  कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाचा धोका टाळण्यास मदत करते. या व्यतिरिक्त, हे डोळ्यांसाठी आणि पचनासाठी देखील चांगले आहे. यात फायबर असते, जे चयापचय वाढवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. हा लोहाचा मुख्य स्त्रोत आहे जो अशक्तपणा दूर करण्यास मदत करतो.

गिलोय
गिलोयमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. जे फ्री रॅडिकल्सवर हल्ला करतात आणि रोगांपासून संरक्षण करतात. हे आपले रक्त शुद्ध करते आणि मूत्रमार्गात संक्रमण आणि यकृताच्या समस्यांपासून मुक्त करते. गिलोयचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय गिलोय ज्यूस पिल्याने रक्तातील साखरेची समस्या नियंत्रणात राहते आणि श्वासोच्छवासाच्या समस्या दूर होते.

आवळा
आवळा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी असते. जे सर्दी आणि इतर आजारांचा धोका कमी करते. आवळ्यामध्ये केराटिन असते, जे नियमित खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण राहते. याशिवाय, हे चरबी जाळण्यास देखील मदत करते. हे चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन वेगाने कमी होते.

जिनसेंग
जिनसेंग एक औषधी वनस्पती आहे. जी उर्जा वाढवण्याचे काम करते आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही अभ्यासानुसार असे आढळले आहे की जिनसेंग कर्करोगाच्या उपचारांमध्ये फायदेशीर आहे. कारण त्यात अँटी-ऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

ब्लूबेरी
ब्लूबेरीमध्ये पौष्टिक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते. ब्लूबेरीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आहे. हे बेरी सर्वात पौष्टिक आहेत, ज्यात फायबर, व्हिटॅमिन सी, के आणि मॅंगनीज सारख्या पोषक असतात. ब्लूबेरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करतात.

 

 

Web Title: natural herbs to increase immunity, benefits of natural herbs in daily life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.