Nails Cutting : रात्री नखं कापण्यास मनाई का करतात घरातील वयोवृद्ध लोक? जाणून घ्या खरं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 11:33 IST2022-03-04T11:33:00+5:302022-03-04T11:33:32+5:30
Nails Cutting : घरातील वयोवृद्ध लोक रात्रीच्या वेळी नखं कापण्यास मनाई करतात. पण ते अशी मनाई का करतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. पण या प्रश्नाचं उत्तर क्वचितच कुणी देतं.

Nails Cutting : रात्री नखं कापण्यास मनाई का करतात घरातील वयोवृद्ध लोक? जाणून घ्या खरं कारण...
Nails Cutting : तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, घरातील वयोवृद्ध लोक रात्रीच्या वेळी नखं कापण्यास मनाई करतात. पण ते अशी मनाई का करतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. पण या प्रश्नाचं उत्तर क्वचितच कुणी देतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आणि नखं कापण्याची योग्य पद्धतही सांगणार आहोत.
काय आहे नखं कापण्याची योग्य पद्धत
अमेरिकन अकॅडमी ऑफ ड्रमेटॉलॉजी असोसिएशननुसार, आपली नखं केराटिनपासून तयार होत असतात. त्यामुळे आंघोळीनंतर नखं कापणं चांगलं मानलं जातं. कारण आंघोळ करताना नखं जेव्हा पाण्यात आणि साबणाच्या पाण्यामुळे सॉफ्ट होतात. तेव्हा ते आरामात कापतात येतात. पण जेव्हा आपण रात्री नखं कापतो तेव्हा जास्त वेळ नखं पाण्याच्या संपर्कात न आल्याने ते हार्ड होतात. त्यामुळे नखं कापण्यात जरा अडचण होते. तसेच ते कापले तर खराब होण्याचीही शक्यता जास्त असते.
रात्री नखं न कापण्याचं दुसरं कारण
रात्री नखं न कापण्याच्या मागे आणखी एक कारण आहे. जुन्या काळात नेल कटर नसायचे. त्यामुळे लोक नखं चाकू किंवा धारदार वस्तूने कापायचे. त्या काळात लाईटही नव्हती. त्यामुळे आधीचे लोक रात्रीच्या अंधारात नखं कापण्यास मनाई करत होते. पण बदलत्या काळासोबत काही लोकांना याला अंधविश्वासासोबत जोडलं. काही लोक आजही याला मानतात आणि आपल्या मुलांनाही तसंच सांगतात.
नखं नेहमी हात ओला करून कापा
नखं कापण्याची योग्य पद्धत ही आहे की, नखं कापण्याआधी बोटं थोडावेळ पाण्यात बुडवून ठेवा. याने नखं नरम होतात आणि कापताना सहजपणे कापले जातात. नखं कापल्यावर ते मॉइश्चराइज करायला विसरू नका. सोबतच प्रयत्न करा की, नखं कापल्यावर हात धुवा. नंतर मॉइश्चरायजर किंवा तेल लावा.
काय करू नये
अनेकदा लोक आपल्या सोयीनुसार जिथे जागा मिळेल तिथे बसून किंवा उभे राहून नखं कापणं सुरू करतात. ही फारच चुकीची सवय आहे. प्रयत्न करा की, नखं कापताना एका व्यवस्थित जागी बसा आणि हळुवार नखं कापाल. कापलेली नखं एका कागदात जमा करा नंतर ते डस्टबिनमध्ये टाका. नखं कधीही कपडा किंवा फर्नीचरवर कापू नका.