शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 6:02 PM

आता देशात कोरोना व्हायरसपेक्षाही गंभीर स्वरुपाच्या आजाराने शिरकाव केला आहे.

(प्रातिनिधीक फोटो)

कोरोनाच्या माहामारीने देशभरात हाहाकार पसरवला आहे. आत्तापर्यंत देशातील  लोक व्हायरसच्या संक्रमणाने हैराण झाले होते.  लॉकडाऊन केल्यामुळे लोकांची कामं पूर्णपणे बंद असून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाची माहामारी कधी आटोक्यात  येणार याच्या प्रतिक्षेत लोक आहेत. आता देशात कोरोना व्हायरसपेक्षाही गंभीर स्वरुपाच्या आजाराने शिरकाव केला आहे.

या आजाराचा पहिला रुग्ण  गुजरातमधील सुरतमध्ये आढळून आला आहे. सुरतमधील एका लहान मुलामध्ये या गंभीर आजाराची लक्षणं दिसून आली आहेत. या आजाराचं नाव मल्टी सिस्टीम इंफ्लेमेटरी सिंड्रोम (Multisystem Inflammatory Syndrome) असे आहे. या आजाराला MIS-C असंही म्हटलं जातं.सुरतच्या लहान मुलांमध्ये अशी लक्षणं दिसून आल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

सुरतध्ये वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबातील १० वर्षीच्या मुलाच्या शरीरात  MIS-C म्हणजेच मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम या आजाराची लक्षणं दिसून आली आहेत.  विशेष म्हणजे हा आजार आतापर्यंत अमेरिका, युरोपीय देशातात मोठ्या प्रमाणावर पसरत होता.  या आजारानेग्रस्त असलेल्या मुलाला सुरतच्या एका रुग्णालयात भरती केलं. याआधी उलट्या, खोकला, अतिसार, ओठ आणि डोळे लाल होणं अशा समस्या उद्भवत होत्या. सुरतच्या डॉ. आशिष गोटी यांनी या मुलाला तपासले त्यानंतर मुंबईच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला.

तपासणीदरम्यान चाचणी केल्यानंतर दिसून आले की या मुलामध्ये मल्टी सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणं आहेत. या गंभीर आजारामुळे संक्रमित लहान मुलांच्या हृदयाचे पंपींग ३० टक्क्यांनी कमी होते. शरीरातील नसांना सुज येते. गंभीर स्थितीत हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. सात दिवसांच्या उपचारांनंतर या मुलाला घरी सोडण्यात आलं आहे. या आजाराची लागण ३ ते २० वर्षाच्या मुलांना होते. या आजारावर उपाय म्हणून उलट्या, खोकला, अतिसार, ओठ आणि डोळे लाल होणं अशी लक्षणं दिसून आल्यास त्वरित मुलांची तपासणी करून घ्या.

दिलासादायक! अखेर 'या' देशात पुढच्या महिन्यापासून सर्वसामान्यांना दिली जाणार कोरोनाची लस

आदार पूनावाला म्हणतात, भारतात 'एवढ्या' रुपयांत मिळणार कोरोना लस; जाणून घ्या किंमत

टॅग्स :Healthआरोग्यSuratसूरतGujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या