हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 17:06 IST2020-09-06T16:58:09+5:302020-09-06T17:06:17+5:30
जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशांतील सरकारला कॅन्सर, डायबिटीस, नॉन कम्यूनिकेबल आजारांच्या रुग्णांच्या उपचारांसाठी प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे.

हृदयरोग, कॅन्सर आणि डायबिटीसमुळे दरवर्षी होतात ४ कोटींपेक्षा अधिक मृत्यू; WHO चा दावा
कोरोनाच्या माहामारीमुळे इतर जीवघेण्या, गंभीर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य तंज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या आजारांच्या उपचारात अडचण निर्माण होणं हे चिंतेचं कारण ठरू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशांतील सरकारला कॅन्सर, डायबिटीस, नॉन कम्यूनिकेबल आजारांच्या रुग्णांच्या उपचारांसाठी प्राथमिकता देण्याचे आवाहन केले आहे.
WHO नं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी या आजारानं ४ कोटींपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. कोरोनाच्या माहामारीचा सामना करत असताना इतर आजारांच्या उपचारांकडे दुर्लक्ष होणं घातक ठरू शकतं. सध्या जगभरात १० पैकी ७ लोकांचे मृत्यू कॅन्सर, डायबिटिस आणि हृदयाच्या विकारांमुळे होत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख एडहेनॉम घेबरीएसेस यांनी दिलेल्या माहितीनुसार आधीपासूनच गंभीर आजारांनी बाधित असलेल्या लोकांसाठी कोरोना विषाणू घातक ठरू शकतो. यात तरूणांचाही समावेश आहे. कॅन्सर, डायबिटीस, डायबिटीस नॉन कम्यूनिकेबल आजारांच्या जाळ्यात अडकून दरवर्षी ४ कोटींपेक्षा अधिक लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. WHO च्या रिसर्चनुसार कोरोनाच्या माहामारीमुळे इतर आजारांवर उपचार घेत असलेल्या लोकांच्या उपचार पद्धतीत ६९ टक्क्यांनी फरक पडला आहे. नॉन कम्यूनिकेबल आजारांमुळे कोरोनाचं संक्रमण होण्याचा आणि त्यामुळे मुत्यू होण्याचा धोका जास्त आहे.
मॅक्सिकोमध्ये डायबिटिसवर आधारीत रिसर्च करण्यात आला होता. त्यानुसार कोरोनामुळे मृत्यू असलेल्या सर्वाधिक रुग्णांना डायबिटिसची समस्या होती. इटलीच्या एका रुग्णालयात मृत्यू झालेल्या लोकांपैकी ६८ टक्के लोक हायपरटेंशन आणि ३१ टक्के लोक डायबिटिसच्या समस्येनेग्रस्त होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार २०३० पर्यंत ७० वयाच्या आधी होत असलेल्या मृतांच्या संख्येत १ तृतीयांश कमतरता आणण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे.
डायबिटिसशी लढण्यासाठी जगभरातील अनेक देश संघर्ष करत आहेत. मागिल २० वर्षात २० कोटींपेक्षा अधिक महिला आणि पुरूषांचे अकाली मृत्यू झाले आहेत. पुढील दशकात १५ कोटी लोकांचा मृत्यू नॉन कम्यूनिकेबल आजारांमुळे होऊ शकतो अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे
दरम्यान कोरोनाशी लढण्याासाठी अनेक देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. जगभरातील अनेक देशांमध्ये लसीचे शेवटच्या ट्प्प्यातील चाचण्या सुरू आहेत. या लसींच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर योग्य प्रोटोकॉलमध्ये बसत असल्यास लसीच्या वापरासाठी परवागनी देण्यात येणार आहे. तोपर्यंत माहामारीशी लढण्यासाठी लोकांनी स्वच्छता पाळणं, सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर करणं गरजेचं आहे.
हे पण वाचा-
लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा
घरी असताना किंवा बाहेर अचानक BP Low झाल्यास; त्वरित करा 'या' पदार्थांचे सेवन
आरोग्यदायी आवळ्याच्या रसाचे 'हे' ५ फायदे वाचून अवाक् व्हाल; स्वतःसह कुटुंबही राहील निरोगी