शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Molnupiravir हे 'जादूचे औषध' नाही, कोरोनाबाधितांवर घरीच उपाय शक्य- AIIMSचे डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 18:23 IST

कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे वाढत्या प्रकरणांमध्ये, कोविड रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ज्यावर घरी उपचार करणे शक्य आहे. त्याचवेळी, डॉक्टरांनी यावर जोर दिला की अँटी-व्हायरल मोलनुपिरावीर (Molnupiravir) हे कोविड -19 रोगासाठी 'जादूचे औषध' नाही.

Covid-19 Mild Symptoms: भारतासह जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, एम्समधील ( AIIMS) एका डॉक्टरांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे वाढत्या प्रकरणांमध्ये, कोविड रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे दिसून येत आहेत, ज्यावर घरी उपचार करणे शक्य आहे. त्याचवेळी, डॉक्टरांनी यावर जोर दिला की अँटी-व्हायरल मोलनुपिरावीर (Molnupiravir) हे कोविड -19 रोगासाठी 'जादूचे औषध' नाही.

संक्रमित उपचार करण्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे?एम्सच्या ( AIIMS) औधष विभागातील अतिरिक्त प्राध्यापक डॉ. नीरज निश्चल यांनी सांगितले की, कोविड-19 च्या उपचारासाठी आतापर्यंत कोणतेही औषध अस्तित्वात नाही. ते म्हणाले की रुग्णाचे काटेकोर निरीक्षण करणे सर्वात महत्वाचे आहे. विशेषत: उच्च-जोखीम असलेले वृद्ध जे आधीच आजारांच्या विळख्यात आहेत किंवा ज्यांचे अद्याप लसीकरण झालेले नाही.

डॉक्टर नीरज निश्चल म्हणाले, 'साथीचा रोग याचा अर्थ असा नाही की जोपर्यंत तुमचे डॉक्टर तुम्हाला अनेक प्रकारची औषधे किंवा नवीन प्रकारच्या गोळ्या देत नाहीत तोपर्यंत तुम्ही बरे होऊ शकत नाही. शेवटी, संयम, सकारात्मक विचार आणि पॅरासिटामॉल देखील बहुतेक रुग्णांना बरे करु शकते.

संक्रमितावर उपचार घरी शक्यते पुढे म्हणाले, ' कोरोना महामारीच्‍या तिसर्‍या लाटेच्‍या काळात, आतापर्यंत बहुतांश संक्रमित लोकांमध्‍ये सौम्य संसर्ग दिसून आला आहे, ज्यावर विशेष उपचारांशिवाय घरी उपचार करणे शक्य आहे.'

केंद्र सरकारने सोमवारी सांगितले की, यावेळी समोर येणार्‍या बाधितांपैकी केवळ 5-10 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे. मात्र, ही परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, अशा परिस्थितीत पूर्ण काळजी घेण्याची गरज असल्याचा इशाराही सरकारने दिला.

नुकत्याच मंजूर झालेल्या मोलनुपिराविरबाबत (Molnupiravir) डॉ. नीरज निश्चल म्हणाले की, हे जादूचे औषध म्हणून प्रसिद्ध केले जात आहे, परंतु तसे नाही. लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की हे औषध केवळ मर्यादित आपत्कालीन वापरासाठी मंजूर आहे.

 

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉन