शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मोबाईल आणि लॅपटॉपमुळे 'या' अवयवांना बसत आहे सगळ्यात जास्त फटका; वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 5:30 PM

डोळ्यांना धुसर दिसणं, डोळयातून पाणी येणं, डोकेदुखी, चष्मा लागणं अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 

शरीरातील इतर अवयवांप्रमाणे डोळे हा खूप संवेदनशील अवयव आहे. मात्र डोळ्यांची काळजी घेण्याकडे अनेकांचे लक्ष नसते. व्यस्त जीवनशैलीत डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक आजारांचा सामना करावा लागतो. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकजण घरून काम करत आहेत. तसंच मोबाईलच्या वापराचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असते. डोळ्यांना धुसर दिसणं, डोळयातून पाणी येणं, डोकेदुखी, चष्मा लागणं अशा समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 

डोळ्यांप्रमाणचे त्वचेसाठीदेखील मोबाईल आणि लॅपटॉपचा लाईट घातक ठरतो. ज्याप्रमाणे उन्हात त्वचेचं नुकसान होतं, तसंच ब्लू लाइटमुळेही त्वचेच्या समस्या उद्भवतात. सतत मोबाईल स्क्रिनचा वापर केल्यामुळे त्वचेवर रिंकल्स, हायपरपिग्मेंटनेशन अशा इतर त्वचेच्या समस्याही उद्भवू शकतात.  सध्या अनेकांचे मोबाईलवर तासनतास गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे.

त्यामुळे  डोळ्यांचे आजार, स्थूलता, रक्तदाब दिसून आलेले आहे. डोळ्यांची जळजळ होऊन  मोतीबिंदू, काचबिंदूसारखे आजार होत आहेत. डोक्याजवळ मोबाइल ठेवून झोपणार्‍यांमध्ये निद्रानाश दिसून येत आहे. यावर उपाय म्हणून फोन, लॅपटॉप चेहऱ्याच्या अगदी जवळ धरू नका. काही अंतरावर मोबाईलचा वापर करा.

मोबाईलचा वापर करताना रात्री नाईट मोडवर ठेवा. शक्यतो रात्री झोपण्याच्या १ ते दिड तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर टाळा.  काही सनस्क्रिन आहेत ज्या लाइटपासून त्वचेला होणारं नुकसान कमी करतात. अशा क्रिम्सचा वापर तुम्ही वापर करू शकता.

संतुलित आहार घ्या. रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय असेल तर आजच बंद करा. शक्यतो मोबाईलचा वापर टाळून लवकर झोपल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. त्वचा आणि डोळ्यांना संरक्षण देईल असा आहार घ्या. जास्तीत जास्त अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा तसंच व्हिटामीन्स प्रोटिन्स  असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

CoronaVirus : 'या' कंपनीच्या लसीच्या चाचणीला मोठं यश ; ९४ टक्के लोकांमध्ये सकारात्मक परिणाम

पावसाळ्यात विषाणूंच्या संक्रमणापासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सांगितले 'हे' सोपे उपाय

टॅग्स :eye care tipsडोळ्यांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य