शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

आर्थ्ररायटिसबाबत गैरसमजच अधिक, जाणून घ्या आर्थ्ररायटिसबद्दलच्या चुकीच्या समजुतींमागचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 5:45 PM

आर्थ्ररायटिस हे जगभरामध्ये अपंगत्वाचे एक प्रमुख कारण आहे. भारतातील दशलक्षांहून अधिक लोकांवर त्याचा परिणाम होत आहे.मात्र आर्थ्रराईटिसबद्दल काही गैरसमजुतीही आहेत.त्याचे निराकरण करणे तितकेच गरजेचे आहे.

सांधेदुखी किंवा हाडांना सूज येणे हा आजार बरेचदा वृद्धापकाळाशी निगडित असतो. आर्थ्ररायटिस हे जगभरामध्ये अपंगत्वाचे एक प्रमुख कारण आहे. भारतातील दशलक्षांहून अधिक लोकांवर त्याचा परिणाम होत आहे. मधुमेह, एड्‌स आणि कॅन्सरसारख्या आजारांच्या तुलनेत आर्थ्ररायटिसचा त्रास जडण्याची शक्‍यता खूप अधिक असते.

आर्थ्ररायटीसचे ऑस्टिओआर्थ्ररायटिस (ओए) आणि हुमॅटॉइड आर्थ्ररायटिस (आरए) असे दोन प्रकार आहेत. ओए आणि आरए या दोन्हींमध्ये सांधे आणि हाडे दुखतात. मात्र आरए ही एक ऑटोइम्युन स्थिती आहे (शरीर स्वत:वरच हल्ला करते) आणि ओए हा अगदी सर्रास आढळून येणारा प्रकार आहे, ज्यामध्ये तुमच्या सांध्यामध्ये असलेल्या हाडांच्या टोकांना आधार देणाऱ्या कूर्चेची हळूहळू झीज होत जाते. मात्र आर्थ्रराईटिसबद्दल काही गैरसमजुतीही आहेत.त्याचे निराकरण करणे तितकेच गरजेचे आहे. या समजूती पुढीलप्रमाणे:

आर्थ्ररायटिस केवळ म्हातारपणी होतो?आर्थ्ररायटिस हा एक सर्रास आढळणारा आजार आहे, जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. तो प्रौढांवर अधिक परिणाम करतो हे खरे असले तरीही हुमॅटॉइड आर्थ्रसाइटिस (आरए)चा त्रास २०-२५ वर्षे वयोगटातील व्यक्तींनाही जडू शकतो.

आर्थ्ररायटिसचे दुखणे म्हणजे सांधेदुखी?हाड तुटणे, जुनाट वेदना, बर्सायटिस आणि दुखापती अशा अनेक कारणांमुळे सांधे दुखू शकतात किंवा अवघडू शकतात. या इतर कारणांमुळे होणा-या वेदना आणि आर्थ्ररायटिस यांच्यामध्ये गल्लत करू नये आणि कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.

आर्थ्ररायटिसवर कोणताच उपाय नाही?आर्थ्ररायटिसवर उपाय शक्‍य आहे किंवा नाही याचे उत्तर प्रत्येक व्यक्‍तीगणिक आणि या आजाराशी संबंधित इतर कारणांनुसार वेगवेगळे येऊ शकते. निरोगी राहणे, तंबाखू सेवन टाळणे आणि वेळापत्रक सांभाळणे यामुळे आर्थ्ररायटिस लवकर बळावत नाही आणि स्थिती बिघडण्यास प्रतिबंध होऊ शकतो.

थंड आणि पावसाळी हवामानामुळे आर्थ्ररायटिस अधिकच गंभीर बनतो?हवामान आणि आर्थ्ररायटिसचे बळावणे यांच्यामधीत संबंध सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. मात्र, कमी तापमानामुळे सांध्यामधील द्रवाच्या सांद्रतेवर परिणाम होतो व त्यामुळे सांधे ताठर भासू शकतात असे डॉक्‍टर सांगतात.

आर्थ्ररायटिसमुळे डोळ्यांवर परिणाम होतो?आर्थ्ररायटिसमुळे होणाऱ्या सांधेदुखीचा डोळ्यांसह शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ शकतो. हुमाटॉइड आर्थ्ररायटिसमुळे डोळे कोरडे होऊ शकतात. डोळ्यांना काही त्रास होत असल्याचे जाणवल्यास तत्काळ डोळ्यांच्या डॉक्‍टरांची भेट घ्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स