शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

"मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ; मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 01:10 IST

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्य, आत्महत्या आणि आपल्याला त्रास देणाºया गोष्टींबद्दल बोलण्याची गरज याविषयीच्या चर्चांना उधाण आलेय.

वेदवती परांजपे - सुर्वेमुळात ‘आपल्या प्रॉब्लेम्सबद्दल बोला रे!’ असे कितीही पोस्ट, स्टेटस आणि लेखांनी घसा फोडून सांगितले, तरी तसे करणे कठीण आहे, हे आधी आपण सर्वांनी मान्य करायला हवे. तुम्हीच विचार करा, मनाच्या खोल तळाशी, कुठल्यातरी कप्प्यात घट्ट बंद करून ठेवलेल्या त्रासांबद्दल बोलणे एवढे सोपे कसे असेल? शिवाय, तसे बोलायचे ठरवले तरी तेवढा संवेदनशील, खरीखुरी काळजी असणारा श्रोता मिळेलच, याची शाश्वती काय? इतके कष्ट घेण्यापेक्षा रोजच्या रुटीनमध्ये, भरपूर कामांमध्ये (दुर्दैवाने कधी दारू, सिगारेटमध्ये) या सगळ्या त्रासाला बुडवून टाकणे आपल्याला जास्त सोपे वाटते. या बुडवाबुडवी प्रक्रियेमुळे आपल्याला वाटते की, आता हे त्रास संपले, सगळे काही ठीक चाललेय. मित्रांनो, लक्षात घ्या, असे वाटणे हा फक्त आभास आहे. अशा खोलवर दाबून, दडपून ठेवलेल्या त्रासदायक भावना, विचार, कल्पना आपोआप नष्ट होत नसतात. काही काळासाठी त्या बाजूला ठेवल्या जातात एवढेच. पण, जेव्हा कधी तुम्ही एकटे असाल, जेव्हा अतिशय गुंतवून टाकणारे काम तुमच्याकडे नसेल, तेव्हा आॅक्टोपससारखे हे सगळे त्रास हळूहळू तुमच्याभोवती पाश आवळायला तयार असतील. त्याची परिणती कधी आत्महत्येमध्ये होऊ शकते, कधी व्यसनांमध्ये, तर कधी रक्तदाब, मधुमेहासारख्या शारीरिक व्याधींमध्ये. यातला कुठलाच परिणाम अर्थातच हवाहवासा नाही आणि म्हणूनच ते टाळण्यासाठी स्वत:च्या दुखऱ्या भावना व्यक्त करण्याचे शिवधनुष्य हे प्रत्येकाला पेलायलाच हवे. त्या ऐकून घेणारा श्रोता-मित्र, भाऊ-बहीण, आई-बाबा, शिक्षक जर तुमच्याकडे असतील, तर छानच आहे. पण, तसं नसेल तर त्यासाठी समुपदेशकांची मदत घ्यायला हवी.

आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजूनही आपल्या समाजात समुपदेशन करून घेण्याबद्दल असलेला दूषित पूर्वग्रह. समुपदेशक/ मानसतज्ज्ञ म्हणून काम करताना लोकांच्या मनात असलेल्या ज्या पूर्वसमजुती नेहमी आढळून येतात, त्याबद्दल थोडेसे लिहिणे आवश्यक वाटते. समुपदेशकाकडे जाणे, हे अजूनही काहीतरी भयंकर समजले जाते. जो अशी मदत घेतो, तो समाजाच्या नजरेत एकतर अगदी वेडा ठरतो किंवा स्वत:चे प्रॉब्लेम स्वत: ज्याला सोडवता येत नाहीत, असा दुबळा! याचे उत्तर फक्त एवढेच आहे की, असा माणूस स्वत:चं जीवन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून धडपडणारी एक व्यक्ती आहे आणि असा ध्यास असणे, हे खरंतर अतिशय शहाणपणाचे लक्षण आहे.

जिथे मलाच माझ्या भावना नीट कळेना झाल्यात, तिथे समुपदेशकाला काय कळणार त्या, असेही बºयाच लोकांना वाटते. पण, एक लक्षात घ्या, कुठल्याही समुपदेशकाने याचेच तर प्रशिक्षण घेतलेले असते! आमच्याकडे येताना लोकांनी एकसंध सुरेख भावना, विचार, त्रास यांचा निबंध घेऊन यावा, अशी मुळी आमची अपेक्षाच नसते. उलट, ते तसे नसणार, हे गृहीत धरून, त्या भावना अजून सुस्पष्ट कशा करता येतील, याचा विचार आम्ही केलेला असतो. तेव्हा काय बोलू, कसे बोलू, याचा फारसा विचार न करता खुशाल मोबाइल अनलॉक करा आणि समुपदेशकाचा नंबर फिरवा.

हा नंबर मिळवण्यासाठी गुगलबाबा, फेसबुक-इन्स्टाग्राम, कदाचित काही परिचितांकडून मिळणारा संदर्भ, असे पर्याय उपलब्ध आहेतच. मात्र, ज्या समुपदेशकाकडे जाणार असाल, त्याच्या शैक्षणिक पदव्या, अनुभव हे सर्व नक्की तपासून पाहा. मानसतज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने समुपदेशन किंवा चिकित्साविषयक मानसशास्त्र असा विशेष विषय घेऊन ट.अ. केलेले असले पाहिजे. समुपदेशक म्हणवून घेणाऱ्यांनी किमान एक ते दीड वर्षाचा एखाद्या मान्यताप्राप्त विश्वविद्यालयातून केलेला असला पाहिजे. दुर्दैवाने दोन-तीन महिन्यांचे छोटे-मोठे कोर्सेस करून स्वत:ला समुपदेशक म्हणून जाहीर करणाºया व्यक्तींची संख्या भारतात कमी नाही. त्यांचा उद्देश कितीही चांगला असला, तरी केवळ दोन-तीन महिन्यांचे प्रशिक्षण इतक्या नाजूक बाबी हाताळणाºया क्षेत्रासाठी पुरेसे नाही.

लेख संपवताना एकच गोष्ट नमूद करते. काही वर्षे या क्षेत्रात काम करताना मी अवसाद व्यक्त होण्याचा अचंबा वाटावा, इतक्या तºहा पाहिल्या आहेत. कधी छोट्याछोट्या गोष्टींमुळेसुद्धा सतत येणारे चिडचिडेपण, कधी कारणाशिवाय सारखी पाठपुरावा करणारी उदासीनता, कधी निद्रानाश तर कधी खूप जास्त येणारी झोप, कधी खाण्यावरून उडालेलं मन, तर कधी खूप वाढलेले जेवणाचे प्रमाण, कधी हुंदके तर कधी नुसताच निरुत्साह, कधी नेहमीचे काम करण्यासाठी होणारे कष्ट आणि आता काहीच करता येणार नाही, अशी टोचणारी अफाट निराशा, कधी आता सगळे संपवूनच टाकू या, अशी लागलेली दुर्दैवी आस. यापैकी काहीही तुम्हाला तुमच्या वागण्यात दिसत असेल किंवा तुमच्या जवळच्या जिवलग व्यक्तीमध्ये ही लक्षणे आढळून येत असतील, तर समुपदेशकांची मदत लवकर घ्या. मानसिक आरोग्यविषयक समस्या कोणालाही भेडसावू शकतात. मनाचा विचार करताना मला सुधीर मोघ्यांची एक सुप्रसिद्ध कविता नेहमी आठवते. मनाच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाचे वर्णन करताना ते लिहितात,

‘मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेलेमन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेलेमन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा’...आणि खरोखरच आपल्या मनाचा थांग भल्याभल्यांनासुद्धा नेहमीच लागतो, असे नाही. पण, पायात रुतलेला काटा जसा आपण त्वरित काढून फेकून देतो, त्याला लपवून, त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही तसेच मनाच्या समस्यांचा सामना करण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठा, खूप कठीण नाही, तर सहज सोपा हवा. कवितेतील पुढच्याच ओळी मनाची दोन वेगळी रूपे अधोरेखित करतात,‘मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळमन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल’तर, आपल्या नाठाळ मनाला तेजाचे राऊळ बनवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे आणि केवळ एक दिवसापुरते नाही तर रोजच्या रोज करण्याचे काम आहे, एवढी आठवण देऊन हा शब्दप्रपंच आवरता घेते.अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर मानसिक आरोग्य, आत्महत्या आणि आपल्याला त्रास देणाºया गोष्टींबद्दल बोलण्याची गरज याविषयीच्या चर्चांना उधाण आलेय. अर्थात, चर्चा तर व्हायलाच हवी. पण, दुर्दैवाची बाब ही आहे की, मानसिक आरोग्यविषयक अशी चर्चा होण्यासाठी इतके भयंकर काहीतरी घडावे लागते. अजून खेद वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे चार दिवस, आठवडाभर चर्चा, स्टेटस, पोस्ट करून सगळे सोशल नेटकरी मानसिक आरोग्य ही कल्पना विसरून दुसºया कुठल्या तरी खळबळजनक बातमीबद्दल बोलतील. गरज आहे ती चर्चेच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याची - स्वत:साठी, स्वत:च्या जिवलगांसाठी आणि समाजासाठीसुद्धा. ते नेमके काय हे सांगण्याचा प्रयत्न म्हणून हा लेखप्रपंच.

(लेखिका मानसतज्ज्ञ असून समुपदेशन मानसशास्त्रात त्यांनी एम.ए., तर औद्योगिक मानसशास्त्रातही एम.ए. केले आहे.)

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्या