शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उलट्या होतात, प्रकाशामुळे डोकं ठणकतं? मग ही असू शकतात मायग्रेनची लक्षणं; वेळीच व्हा सावध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 15:28 IST

अनेकदा डोकेदुखीचे प्रमाण वाढून त्याचे नंतर मायग्रेनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते.

Health Tips : अनेकदा डोकेदुखीचे प्रमाण वाढून त्याचे नंतर मायग्रेनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते. औषधोपचार वेळेत घेतल्यास मायग्रेन हा नियंत्रणात ठेवता येण्यासारखा आजार आहे.

बऱ्याचदा आपण एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये इतके अडकतो की आपण नीट विचार करू शकत नाही. एखाद्या गोष्टीचा ताण येतो किंवा वेळेवर जेवत नाही. या  गोष्टींमुळे डोकेदुखी होते. ही डोकेदुखी मायग्रेनचे रूप घेऊ शकते.

काय आहे मायग्रेन?

मायग्रेन ही एक प्रकारची डोकेदुखी आहे ज्यामध्ये उलट्या होणे, अस्वस्थता, प्रकाश आणि मोठ्या आवाजाची संवेदनशीलता यासारखी लक्षणे दिसतात. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की सहनशक्तीच्या पलिकडे जाते. आपल्याला माहीत आहे की आपले डोके संपूर्ण शरीराशी जोडलेले आहे? डोके निरोगी असेल, तरच आपले शरीरही निरोगी राहते. मेंदूद्वारेच आपण विचार करतो, शिकतो आणि गोष्टी लक्षात ठेवतो. 

हा एक प्रकारचा मेंदू विकार असून जो ३५ ते ४० वयोगटातील लोकांमध्ये वेगाने विकसित होतो. डब्ल्यूएचओच्या मते, हा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो जो मुख्यतः हार्मोनल प्रभावामुळे होतो. 

हा उपाय ठरेल फायद्याचा-

१) आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आपले मन आपल्याला सांगते. मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी हेडमसाज उपयुक्त ठरतो. 

२) या त्रासाचे प्रमाण जास्त असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही फायदेशीर ठरते. एकदा ही डोकेदुखी सुरू झाली की काम, खाणे-पिणे, दैनंदिन व्यवहार असे काहीही सुचेनासे होते. त्यामुळे हा त्रास उद्भवूच नये यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली.

ही घ्या काळजी  :

१) जेव्हा रक्तप्रवाह मेंदूपर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नाही, तेव्हा ब्रेन स्ट्रोकचा धोकाही निर्माण होतो.

२) मसाजमुळे तणाव संप्रेरक कॉर्टिसॉल कमी होते आणि सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी 'फील गुड' हार्मोन्स वाढते. यामुळे आपल्याला तणावापासून आराम मिळतो. हेडमसाज केल्याने मेंदूतील रक्ताभिसरण वाढते.

३) जेव्हा प्रेशर पॉइंट्स दाबले जातात, तेव्हा त्या ठिकाणी रक्तप्रवाह वाढतो. असे केल्याने केसांची वाढ चांगली होते. ४)  भरपूर पाणी पिणे तसेच वेळेवर जेवण करणे अति मसालेदार पदार्थ खाऊ नये, असा सल्लाही तज्ज्ञ देतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल