शरीरातील मेटाबॉलिज्म कमजोर झालं आहे का?; 'हे' उपाय करतील मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 16:04 IST2019-03-25T16:02:01+5:302019-03-25T16:04:08+5:30
सध्या अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, मेटाबॉलिज्मची कमतरता. मेटाबॉलिज्म म्हणजे, शरीरातील पचनक्रियेची प्रक्रिया.

शरीरातील मेटाबॉलिज्म कमजोर झालं आहे का?; 'हे' उपाय करतील मदत!
(Image Credit : Momspresso)
सध्या अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, मेटाबॉलिज्मची कमतरता. मेटाबॉलिज्म म्हणजे, शरीरातील पचनक्रियेची प्रक्रिया. ज्यामार्फत अन्नाचे पचन होऊन त्यातून तयार होणारा पाचक रस शरीराला एनर्जीच्या रूपामध्ये मिळतो. परंतु, जेव्हा हे काम व्यवस्थित होत नाही त्यावेळी लठ्ठपणा वाढू लागतो. शरीराला फिट आणि फाइन ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्मची प्रक्रीया योग्य पद्धतीने होणं आवश्यक असतं. जाणून घेऊया त्या खास पद्धतींबाबत ज्यामुळे शरीरातील पाचनक्रीया मजबुत होण्यासाठी मदत होते.
काय आहे मेटाबॉलिज्म?
मेटाबॉलिज्म ही शरीरात होणारी एक महत्त्वपूर्ण क्रिया आहे. यातून सेवन केलेला आहार ऊर्जेत बदलला जातो. शरीराला प्रत्येक कामासाठी ऊर्जेची गरज पडते. आणखी साध्या शब्दात सांगायचं तर मेटाबॉलिज्मने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वेगवेगळ्या पेशी तयार करण्यास मदत मिळते. मेटाबॉलिज्मीची क्रिया आपल्या शरीरात 24 तास सुरु असते. इतकेच काय तर आपण आराम करत असतानाही याची क्रिया सुरु असते.
मेटाबॉलिज्म फिट तर आरोग्य हिट
मेटाबॉलिज्म योग्य आणि नियंत्रणात असेल तर शरीर फिट राहतं. जर मेटाबॉलिज्म कमी किंवा जास्त झालं, तर वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. याच कारणाने मेटाबॉलिज्म नियंत्रित ठेवण्यासाठी नियमीत व्यायाम करणे गरजेचे आहे. याने शरीर मजबूत होतं आणि वजनही नियंत्रणात राहतं.
कॅलरीबाबत सजग राहणं
तुमचा Basal Metabolic Rate म्हणजे, दररोज शरीराद्वारे आराम करण्यामध्ये खर्च करण्यात आलेल्या कॅलरींची संख्या असते. त्यामुळे आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की, तुम्ही दररोज किती कॅलरींचे सेवन करत आहात. तसेच तुम्ही दिवसभरामध्ये किती कॅलरी बर्न करता याचाही संख्या लक्षात ठेवा.
वेट लिफ्टिंग आहे योग्य एक्सरसाइज
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, वजन उचलणं वाडत्या वयानुसार ज्या पोटाच्या किंवा पचनाच्या समस्यांचा सामना करावा लागतो त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे वेट लिफ्टिंग मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी मदत करतं.
झोपण्यापूर्वी काहीतरी खा
जर तुम्ही विचार करत असाल की, रात्री आठ वाजल्यानंतर काही खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही तर तुम्हाला अपडेट होण्याची गरज आहे. फ्लोरिडा स्टेट विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनानुसार, झोपण्याच्या 30 मिनिटं आधी 150 कॅलरींचं सेवन केल्याने पचनक्रिया उत्तम राहण्यास मदत होते.
रोल्ड ओट्स खा
रोल्ड ओट्समध्ये विघटनशील फायबर मोठ्या प्रमाणात असतं. यामुळे पाचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच हे शरीरातील इन्सुलिनचा स्तर कमी करण्यासाठी मदत करतं.
ग्रेपफ्रूट किंवा आंबट फळं
ग्रेपफ्रूट म्हणजेच आंबट फळं तुमच्या शरीरातील फॅट्स वाढविणाऱ्या इन्सुलिनचा स्तर कमी करतात. यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. ग्रेपफ्रूटचा गुलाबी रंग यामध्ये असलेलं लायकोपीनचं कारण असतं. लाइकोपीन ट्यूमर सेल्स नष्ट करण्यासाठी ओळखलं जातं. तसेच यामुळे पचनक्रीया सुधारण्यासही मदत होते.