'सॉक्स'ची वास घेण्याची सवय पडली महागात, रुग्णालयात सुरु आहे उपचार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 15:48 IST2018-12-15T15:41:31+5:302018-12-15T15:48:51+5:30
आता वरची हेडलाइन वाचून अनेकांनी तोंड वाकडं केलं असेल किंवा अनेकांनी नाकं मुरडली असतील. पण हे खरंय.

'सॉक्स'ची वास घेण्याची सवय पडली महागात, रुग्णालयात सुरु आहे उपचार!
आता वरची हेडलाइन वाचून अनेकांनी तोंड वाकडं केलं असेल किंवा अनेकांनी नाकं मुरडली असतील. पण हे खरंय. ही चीनची घटना असून या व्यक्तीला ही किळसवाणी सवय होती. हा व्यक्ती रोज ऑफिसमधून घरी परतल्यावर सर्वातआधी सॉक्सचा घाणेरडा वास घ्यायचा. पण या व्यक्तीला त्याची ही चांगलीच महागात पडली आहे. आता या व्यक्तीला या सवयीमुळे गंभीर आजार झाला असून तो रुग्णालयात दाखल आहे.
चीनच्या Zhangzhou मध्ये राहणाऱ्या या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांचं म्हणनं आहे की, रोज स्वत:च्या सॉक्सचा घाणेरडा वास घेतल्याने या व्यक्तीला फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं आहे. या इन्फेक्शनमुळे या व्यक्तीला श्वास घेण्यास फार त्रास होत आहे.
खरंतर सॉक्स घेण्याची सवय असल्याचं हे काही पहिलं प्रकरण नाहीये. अनेकांमध्ये ही सवय आढळते. पण यामुळे इतकं गंभीर इन्फेक्शन झाल्याचं कधी ऐकायला मिळालं नाही. या व्यक्तीला त्याच्या सवयीमुळे एकाच नाही तर वेगवेगळ्या इन्फेक्शनचा सामना करावा लागतो आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.