शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये मोबाईलच्या वापराने होतोय 'पिंकी सिंड्रोम' चा प्रसार, जाणून घ्या कसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 13:07 IST

स्मार्ट फोनच्या वापरामुळे पिंकी सिंड्रोम ही समस्या वाढत चालली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार देशात अनेक भागात पिंकी सिंड्रोममुळे लोक ग्रासलेले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे कोट्यावधी लोक वेगवेगळ्या शहरात आपल्या घरात बंद आहेत. अशा परिस्थीतीत मोबाईलचा वापर सगळ्यात जास्त केला जात आहे. त्यात स्मार्टफोन वापरत असलेल्यांची संख्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.  स्मार्ट फोनच्या वापरामुळे पिंकी सिंड्रोम ही समस्या वाढत चालली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार देशात अनेक भागात सिंड्रोममुळे लोक प्रभावीत आहेत.

तज्ञांच्यामते पिंकी सिंड्रोम ही समान्य समस्या आहे. जास्तवेळ हातात मोबाईल पकडल्यामुळे ही समस्या उद्भवते. या आजारात बोटं वाकडी तिकडी होतात. ही समस्या सगळ्यात लहान असलेल्या बोटाला जास्त उद्भवते. या बोटाला पिंक फिंगर असं सुद्धा म्हणतात. म्हणूनच या आजाराला पिंक सिंड्रोम म्हणतात.ही तात्पुरत्या स्वरुपाची समस्या आहे. तर काही सर्जनतज्ञांच्यामते एखाद्या व्यक्तीला हातांशी संबंधित कोणताही आजार असेल किंवा हाडांमध्ये समस्या असेल तर हा आजार होऊ शकतो.

लॉकडाऊनमध्ये सिंड्रोमचा वाढता परिणाम

एखादा व्यक्ती ५ ते ६ तास मोबाईलचा वापर करत असेल, तर तोच व्यक्ती लॉकडाऊनमध्ये १० ते १४ तास फोनचा वापर करत आहे. त्यामुळे स्मार्टफोन युजर्समध्ये ही समस्या वाढली आहे. पिंकी सिंड्रोम ही समस्या नसली तरी स्मार्टफोनचा अतिवापर जास्तीत जास्त हातांना आणि डोक्याच्या नसांना प्रभावीत करणारा असतो.

त्यामुळे स्मार्टफोन सतत पकडल्यामुळे मनगट, खांदे आणि हातांचे कोपरे दुखायला सुरूवात होते. कोणतंही जड सामान उचलण्याची क्षमता कमी होते. याचा परिणाम डोळ्यांवर सुद्धा होतो.  धुसर दिसणं, डोळे दुखणं, चक्कर येणं. डोळ्यांमधून पाणी बाहेर येणं अशा समस्या उद्भवतात.

स्मार्टफोनपासून होत असलेल्या पिंकी सिंड्रोमच्या बचावाचे उपाय 

या सिंड्रोमपासून वाचण्यासाठी सगळ्यात  महत्वाचं आहे ते म्हणजे स्मार्ट फोनचा वापर कमीत कमी करा, मोबाईल फोन नेहमी स्वतःच्या जवळ ठेवू नका, गरजेपेक्षा जास्त फोनचा वापर केल्यामुळे तुम्ही या आजाराला बळी पडू शकता, जास्तवेळ फोनवर बोलायचं असेल तर इअरफोन्सचा वापर करा, हातांची स्ट्रेंचिंग करून व्यायाम करा. त्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहिल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सMobileमोबाइल