शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

सावध ऐका हृदयाच्या हाका! ‘केके’च्या अकाली एक्झिटपासून घ्या धडा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 07:54 IST

छातीमध्ये जळजळ वाटणे, पित्ताचा त्रास हा नेमका हृदयाशी जोडलेला आहे का, याविषयी अजूनही अनभिज्ञता आहे.

- डॉ. अतुल लिमये, हृदयरोगतज्ज्ञ

प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला. कोलकाता येथे कॉन्सर्टमध्ये लाइव्ह परफॉर्म करत असताना त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार, सिद्धार्थ शुक्ला यांनीही अकाली एक्झिट घेतली. या सर्व घटनांमुळे तणाव आणि बदलत्या जीवनशैलीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हे कसे टाळता येऊ शकते... 

छातीमध्ये जळजळ वाटणे, पित्ताचा त्रास हा नेमका हृदयाशी जोडलेला आहे का, याविषयी अजूनही अनभिज्ञता आहे. त्यामुळे अशा त्रासाला प्राथमिकपणे केवळ पित्तनाशक औषधांनी उपचार करून दुर्लक्षिले जाते, अन् वैद्यकीय सल्ला घेणे टाळले जाते. परिणामी, हा त्रास कालानुरूप वाढून यातून हृदयविकार वा कार्डिॲक अरेस्ट अशा स्वरूपाचे आजार उद्भवू शकतात. पित्ताच्या त्रासाचा वैद्यकीय इतिहास नसताना एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ लागला, तर त्याचे गांभीर्य वेळीच ओळखले पाहिजे. याविषयी जागरूक राहून त्वरित वैद्यकीय सल्ला व औषधोपचार केले पाहिजेत.

पूर्वीच्या काळात व्यसनाधीन असणाऱ्या वा सहव्याधी म्हणजेच उच्चरक्तदाब, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा अधिक धोका असायचा. मात्र गेल्या काही वर्षांत याचे समीकरण बदलले असून हृदयविकाराचे वय ऐन तारुण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत अनुवंशिकता नसलेले, व्यसन नसलेल्या, सहव्याधी नसणाऱ्या तरुणाईलाही हा आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास त्वरित हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला तसेच, सल्ल्यानुसार ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, टू डी इको, एक्स रे अशा प्राथमिक चाचण्या करून घ्याव्यात. जेणेकरून पुढील औषधोपचारांची दिशा निश्चित करण्यासाठी मदत होते. कायमस्वरूपी सुदृढ आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी अवलंबिल्या पाहिजेत.

हा आहे फरक हृदयविकाराचा झटका येतो, त्यावेळेस हृदयाला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो. तर कार्डिॲक अरेस्टच्या स्थितीत हृदयाचे स्पंदन किंवा धडधड बंद होते. हृदयविकाराचा झटका रक्ताभिसरणातून उद्भवणारा हा गंभीर दोष आहे. तर अरेस्टमध्ये हृदयातील विद्युत क्रिया (इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी) बंद पडल्यामुळे निर्माण होणारा हा प्राणांतिक दोष असतो. 

‘सीपीआर’विषयी लोकसाक्षरता वाढविली पाहिजेसीपीआरचा फुलफॉर्म कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन हा आहे. हे एक आपत्कालीन वैद्यकीय तंत्र आहे, ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदय थांबल्यास त्याचे प्राण वाचवता येतात. सीपीआरमध्ये रुग्णाच्या छातीवर दबाव दिला जातो, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

टॅग्स :KKकेके कृष्णकुमार कुन्नथHealthआरोग्य