शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

दिवसभरात 1 तास खळखळून हसा आणि 400 कॅलरीज् बर्न करा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2018 5:31 PM

स्पर्धात्मक युगात 'या गोष्टीचं  टेन्शन, त्या गोष्टीचं टेन्शन' यामुळे प्रत्येक जण हल्ली हसणंच विसरला आहे जणू. तुम्ही  शेवटंच प्रचंड खळखळून हसल्याचं तुम्हाला तरी आठवतंय का?.

स्पर्धात्मक युगात 'या गोष्टीचं  टेन्शन, त्या गोष्टीचं टेन्शन' यामुळे प्रत्येक जण हल्ली हसणंच विसरला आहे जणू. तुम्ही  शेवटंच प्रचंड खळखळून हसल्याचं तुम्हाला तरी आठवतंय का?. आठवत नाहीय ना. कारण सततच्या दगदगीत निवांतपणाच हरवल्यानं ताणतणाव वाढत आहे. शारीरिक-मानसिक तणावासहीत इतर आजारांनाही दूर पळवायचं असेल तर यावर एकमेव स्वस्त आणि मस्त उपाय म्हणजे 'खळखळून हसणं'. मनापासून हसण्यानं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हसणं हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय आहे. खळखळून हसण्यानं शरीरातील स्नायू, डोळे, जबडा आणि हृदय यांच्या स्नायूंना आराम मिळतो. युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडमधील एका संशोधनानुसार, मोकळेपणानं हसणाऱ्यांच्या शरीरात रक्ताभिसरणाची प्रक्रिया उत्तम प्रकारे कार्य करते.  10 मिनिटांपर्यंत खळखळून हसण्यानं आपल्याला वेदनादायी त्रासापासून 2 तास मुक्ती मिळते. हसरी माणसं दीर्घ काळापर्यंत तरुण राहतात, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजारांना दूर ठेवायचं असेल तर मनमुराद हसा. 

जाणून घेऊन मनमुराद हसण्याचे आरोग्यदायी फायदे - 1. उत्साही दिवस:सकाळच्या वेळेस हास्य ध्यान योग केल्यास तुमचा संपूर्ण दिवस प्रसन्न आणि उत्साही राहतो. या योगमुळे शरीरात काही हार्मोन्सचा प्रवाह सुरू  होतो. मधुमेह, पाठदुखी आणि तणावानं त्रस्त असलेल्यांना याचा अधिक फायदा होतो. 2. हृदय निरोगी राहते :हसण्यामुळे हृदयाचाही उत्तम व्यायाम होतो. यामुळे रक्ताभिसरणाचीही प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीनं होते. हसण्यामुळे शरीरातून एंडोर्फिन नावाचे रसायन उत्सर्जित होते, हे रसायन हृदयाला मजबूत ठेवण्याचे कार्य करते. हसण्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचाही धोका कमी होतो. ज्यांना हृदयाविकार आहेत, अशांसाठी हसणे हे फार उपयुक्त आहे. 10 मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयाच्या ठोक्यांची गती तीव्र होते. त्या गतीसाठी एक मिनिट हसणे पुरेसे आहे. हे एका संशोधनातून समोर आले आहे.3.कॅलरीज् घटतात :तणावापासून मुक्ती मिळण्यासोबत 10 मिनिटांपर्यंत सलग हसण्यानं 20 ते 30 कॅलरीज् बर्न होतात. तुम्हीदेखील वजन नियंत्रणात आणण्यासाठी आटोक्यात प्रयत्न करत असाल तर जिममध्ये हजारो रुपये खर्च न करता केवळ मनमोकळेपणानं हसा. यामुळे तुमच्या कॅलरीज् नैसर्गिकरित्या बर्न होतील आणि अनावश्यक खर्चही टाळला जाईल.4.स्पॉन्डेलायटिसवर हसणं फायदेशीर : स्पॉन्डेलायटिस, कंबरदुखी यांसारख्या वेदनादायी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हसणं हा एक प्रभावी पर्याय आहे. लाफिंग थेरपीच्या मदतीनं डॉक्टर रुग्णांना आराम देण्याचं काम करतात. 5. रोगप्रतिकारकशक्ती वाढते :हसण्यामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे कर्करोगाच्या पेशी आणि अन्य प्रकाराचे हानिकारक जीवाणू आणि व्हायरस नष्ट होतात. एकूणच हसण्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हसण्याच्या प्रक्रियेदरम्यान आपण खोलवर दीर्घ श्वास घेत असतो, यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा अधिक चांगल्या प्रकारे होतो. परिणामी आपण दीर्घ काळापर्यंत ताजेतवाने राहतो.6. तणावातून मिळते मुक्तता :ताणतणाव, वेदना इत्यादी त्रासदायक बाबींचा खात्मा करण्याची शक्ती हसण्यामध्ये आहे. मोकळेपणाने हसण्यामुळे सर्व तणाव दूर होतो. खळखळून हसल्यास तणावामुळे होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक समस्यांपासून बचाव होतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स