Know why plucking nose hair might kill you all you need to know | मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा

मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा

अनेकांना घरी बसल्या बसल्या नाकातील केस तोडण्याची सवय असते. तोंडाचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक पुरूष दाढी केल्यानंतर हातात कैची घेऊन नाकातील केस कापायला सुरूवात करतात. तुम्हाला माहीत आहे का? केस तोडण्याची हीच सवय तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. नकळतपणे याच सवयीमुळे तुमचा जीवसुद्धा जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला नाकातील केसांच्या महत्वाच्या गोष्टींबाबत माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. 

नाकात दोन प्रकारचे केस असतात

नाकात केस दोन प्रकारचे असतात. यापैकी काही केस लहान आणि काही जाड असतात. लांब नाकाच्या केसांना व्हिब्रिस म्हणतात. नाकाचे केस हे शरीराच्या संरक्षण प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण जेव्हा श्वास घेतला जातो तेव्हा ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईड तसेच बॅक्टेरिया, धूळ आणि घाण देखील शरीरात प्रवेश करते. त्यावेळी नाकातील केस धूळ, घाणीला नाकात जाण्यापासून रोखतात

शरीरासाठी फायदेशीर असतात नाकातील केस

नाकातील केस बॅक्टेरिया, धुळ आणि घाणीला शरीरात जाण्यापासून रोखतात. नाकात  जर केस नसतील तर श्वास घेताना धूळ, माती, बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात. यामुळे मोठ्या आजारांशी सामना करावा लागू शकतो. नाकात केस असतील तर  घाण, धूळ शरीरात प्रवेश करू शकत नाही. म्हणून नाकातील केस कापणं टाळायला हवं.

आपले नाक स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी नाकातील केस महत्वाची भूमिका बजावतात. नाकाचे केस कापताना बॅक्टेरिया नाकात शिरतात आणि संसर्ग होऊ शकतो. याव्यतिरिक्त, नाकातील केस फुफ्फुसांच्या फिल्टरसाठी कार्य करत असतात.

नाकातील  केस काढल्यानं कसा होऊ शकतो मृत्यू?

नाकात रक्तवाहिन्या असतात. त्या थेट मेंदूजवळ असलेल्या रक्तवाहिन्यांशी जोडलेल्या असतात. म्हणून, धक्क्याने नाकाचे केस तोडल्यामुळे रक्तवाहिन्यांत छिद्र होते आणि रक्त बाहेर येऊ लागते. यामुळे गंभीर संसर्ग होतो, जो मेंदूच्या मज्जातंतूपर्यंत पोहोचतो आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. काय सांगता? आता गांजा वाचवू शकतो कोरोनाग्रस्तांचा जीव, रिसर्चमधून दावा

नाकाचे केस न कापण्याचा प्रयत्न करा कारण नाकातील केसांमुळे धूळ, घाण आणि बॅक्टेरिया तुमच्या नाकात शिरणार नाहीत.  नाकाचे केस कापायचे असल्यास लहान कात्रीने कापून घ्या किंवा आपण नाक हेअर ट्रिमर वापरू शकता.'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब  

(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहीती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. )

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Know why plucking nose hair might kill you all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.