know how coriander dhaniya seeds help manage blood sugar levels | 'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब 

'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब 

धणे हा भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा मसाला आहे. धणे, कोथिंबीर आणि कोथिंबीर पावडर मसाल्याच्या रूपात अन्नाला चांगली चव देण्यासाठी वापरली जाते, परंतु याशिवाय हे निरोगी फायद्याने देखील भरलेले आहे. यामध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलिफेनोल्स, बी-कॅरोटीनोईड्स, लोह, कॅल्शियम, खनिजे, फायबर, मॅग्नेशियम तसेच जीवनसत्त्वे ए, के आणि सी असतात. आयुर्वेदात त्याचे अनेक औषधी गुणधर्मही नमूद केलेले आढळतात. अभ्यासानुसार धणे आणि धन्याची पानं हे बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. चला तर मग जाणून घ्या धने आणि कोथिंबीर विविध रोगांसाठी कशी उपयुक्त आहे.

काविळ

काविळ झाल्यास वाळलेल्या धणे, साखर, आवळा, वडाचे मुळ समान प्रमाणात बारीक करा. सकाळी आणि संध्याकाळी अर्धा ग्लास पाण्यात 1 चमचा पावडर घेतल्यास कावीळ, यकृतातील सूज आणि लघवी कमी होणे यासारख्या समस्या दूर होतात.

डायबिटीस

आयुर्वेदानुसार डायबिटीससाठी धण्याचे दाणे खाणे खूप फायदेशीर आहे. हे कोलेस्ट्रॉल आणि चरबीची पातळी कमी करण्यात मदत करते. त्याच्या बियांमध्ये फ्लावोनॉइड्स, पॉलीफेनोल्स, बी-कॅरोटीनोईड्स सारख्या संयुगे रक्तातील एंटी-हायपरग्लॅकायमिक, इन्सुलिन डिस्चार्जिंग तयार करतात. जे आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. डायबिटीसच्या  रूग्णांनी 10 ग्रॅम धणे घ्या. २ लिटर पाण्यात भिजवून ठेवा आणि रात्रभर झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून सेवन करा.

तोंडाच्या अल्सरपासून आराम

तोंडात अल्सर होणं ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी १ चमचे धणे पावडर घ्या, २५० मिली पाण्यात चांगले मिसळा, नंतर हे पाणी गाळून घ्या. दिवसातून २ वेळा या पाण्याने गुळण्या करा.

मासिक पाळीतील वेदना कमी होतात

गर्भाशयाच्या आकुंचन कालावधी दरम्यान ओटीपोटात आणि आतड्यात असह्य वेदना होतात. या वेदनापासून आराम मिळवण्यासाठी कोथिंबिरीपासून बनवलेला चहा पिणे खूप फायदेशीर आहे, यासाठी चहा बनवताना त्यात अर्धा चमचाधणे घाला. कोथिंबिरीत असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुण एनाल्जेसिक औषध म्हणून काम करून वेदना कमी करते.

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाला जळजळ उद्भवल्यास झाल्यास पापण्यांच्या आत आणि बाहेर जळजळीमुळे सूज, खाज सुटते तसेच डोळे लाल होतात. कोथिंबिरीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरियाचे गुणधर्म दाह वाढविणार्‍या सायटोकिन्स कंपाऊंडशी लढण्यास मदत करतात. 'लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, अगदी ठणठणीत'; लसीकरणानंतर एम्स तज्ज्ञांनी सांगितला अनुभव

हदयासाठी फायदेशीर

कोथिंबीर कोलेस्टेरॉल आणि चरबीची पातळी नियंत्रित ठेवण्यास तसेच हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसेराइड्स हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे कारण आहेत. कोथिंबिरीच्या बियामध्ये हायपोलीपिडेमिक असते, जे शरीरात उपस्थित असलेल्या ट्रायग्लिसरायड्सची पातळी कमी करून हृदय निरोगी ठेवते. हिवाळ्यात 'या' ५ पीठांपासून बनवलेली भाकरी खाल; तर आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाणं विसराल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: know how coriander dhaniya seeds help manage blood sugar levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.